World Cup 2023 : पराभव ऑस्ट्रेलियाचा पण, धक्का टीम इंडियाला; आफ्रिकेने केला मोठा उलटफेर

World Cup 2023 : पराभव ऑस्ट्रेलियाचा पण, धक्का टीम इंडियाला; आफ्रिकेने केला मोठा उलटफेर

World Cup 2023 : वर्ल्ड कप (World Cup 2023) जिंकण्याचे मनसुबे घेऊन आलेल्या बलाढ्य ऑस्ट्रेलिया (Australia) संघाला सलग दुसऱ्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेतील दहाव्या सामन्यात आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा तब्बल 134 धावांनी पराभव केला. आफ्रिकेने (South Africa) हा सामना मोठ्या फरकाने जिंकल्यानंतर गुणतालिकेत मोठा उलटफेर झाला आहे. टीम इंडियासह (Team India) तीन संघांना धक्का बसला आहे. या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेने प्रथम क्रमांकावर झेप घेतली आहे. काल परवापर्यंत टॉप असलेल्या न्यूझीलँड संघाची आता दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. भारतीय संघ तिसऱ्या  तर पाकिस्तानचा संघ थेट चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे.

World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाचा सलग दुसरा पराभव; दक्षिण आफ्रिकेने 134 धावांनी उडविला धुव्वा

या स्पर्धेत आतापर्यंत प्रत्येक संघांचे दोन सामने झाले आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिका, न्यूझीलँड, पाकिस्तान आणि भारताने दोन्हीही सामन्यांत विजय मिळवला आहे. तर इंग्लँड आणि बांग्लादेशने प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. श्रीलंका, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानला एकही सामना जिंकता आलेला नाही. साऊथ आफ्रिका आणि न्यूझीलँडचा रनरेट चांगला आहे. त्यामुळे हे दोन्ही संघ भारतापेक्षा पुढे आहेत. आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाचा ऑस्ट्रेलियाला मोठा फटका बसला आहे. संघाची थेट नवव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

दरम्यान, कालच्या सामन्यात आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडासमोर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज चाचपडत खेळत होते. त्याने आठ षटकांत 33 धावा देत 3 विकेट घेतला. याचबरोबर मार्को येनसन, तबरेज शम्सी आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन विकेटस् घेतल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्विंट डिकॉकने जोरदार फटकेबाजी करत शानदार शतक झळकविले. त्याने 106 चेंडूत 109 धावांची जोरदार खेळी केली. त्यात आठ चौकार आणि सहा षटकारांचा समावेश आहे. या वर्ल्ड कपमध्ये डिकॉकने सलग दुसरे शतक झळकविले आहे. त्यामुळे भारताचा मैदानात आता डिकॉक हा इतर संघांसाठी धोकादायक ठरू लागला आहे.

हिटमॅन रोहित शर्मा सिक्सर किंग बनल्यानंतर ख्रिस गेलनं दाखवली जर्सी; रोहितचं अनोखं उत्तर…

प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाची सुरुवातीपासून पडझड झाली. पहिल्या पावर प्लेमध्ये मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव स्मिथ हे तंबूत परतले. त्यानंतर ऑस्ट्रेलिया डाव सांभाळता आला नाही. मार्नस लाबुशेननने सर्वाधिक 46 धावांची खेळी करत संघाला सांभाळण्याचा प्रयत्न केला. मिचेल स्टार्क 27 आणि पॅट कमिन्स 22 धावा करू शकला. बाकीचे फलंदाज वीस धावांही करू शकले नाहीत. त्यामुळे 41 व्या षटकात ऑस्ट्रेलिया संघ 177 धावांत गारद झाला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube