हिटमॅन रोहित शर्मा सिक्सर किंग बनल्यानंतर ख्रिस गेलनं दाखवली जर्सी; रोहितचं अनोखं उत्तर…

हिटमॅन रोहित शर्मा सिक्सर किंग बनल्यानंतर ख्रिस गेलनं दाखवली जर्सी; रोहितचं अनोखं उत्तर…

Rohit Sharma : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma )वर्ल्डकप 2023 मधील अफगाणिस्तानविरुद्धच्या (Afghanistan)सामन्यात एक अनोखा इतिहास रचला आहे. रोहित शर्माने 84 बॉलमध्ये 16 चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 131 धावा केल्या. याचवेळी रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम केला आहे.

कंत्राटी पोलीस नेमण्यासाठी सरकार वर्षाला 100 कोटी रुपये का देतंय? कंत्राटी भरतीचा निर्णय का?

रोहितने या सामन्यात धमाकेदार खेळी करत विरोधी संघाच्या बॉलर्सच्या नाकीनऊ आणले. अफगाणिस्तानच्या बॉलर्सनी रोहितसमोर नांग्या टाकल्याचे पाहायला मिळाले. तुफान खेळीच्या जोरावर रोहितने 131 धावा केल्या. रोहित शर्माने वेस्ट इंडिजचा माजी सलामीवीर ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढत ही ऐतिहासिक कामगिरी केली. ख्रिस गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 551 सामन्यांमध्ये 553 षटकार ठोकले होते. तर टीम इंडियाच्या कर्णधाराने 473 डावात 556 षटकार मारले आहेत.

युनिव्हर्स बॉस म्हणून प्रसिद्ध असलेल्या ख्रिस गेलचा विक्रम रोहित शर्माने विक्रम मोडल्याबद्दल X वर अभिनंदन केले. त्याला रोहित शर्माने उत्तर दिले. रोहितचे उत्तर चाहत्यांना खूप आवडले आहे. ख्रिस गेलने पोस्ट लिहिली आहे की,अभिनंदन, रोहित शर्मा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकले. 45 क्रमांक खास आहे. या पोस्टवर रोहित शर्माने उत्तर दिले, धन्यवाद ख्रिस गेल. आमच्या पाठीवर 4 आणि 5 आहेत, पण आमचा आवडता क्रमांक 6 आहे.

National Cinema Day निमित्त शाहरूखचं चाहत्याना गिफ्ट; जवान चित्रपट…

बीसीसीआयने रोहित शर्माचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडीओमध्ये रोहित शर्माने म्हटले आहे की, त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात तो इतके षटकार मारील असं त्याला अजिबात वाटलं नव्हतं. मी खेळायला सुरुवात केली तेव्हाही मी षटकार मारण्याचा विचार केला नाही. इतके षटकार तर सोडाच. अनेक वर्षांपासून खूप मेहनत घेतली आहे, हे त्याचे फळ आहे. त्यामुळे मी केलेल्या कामगिरीबद्दल मी अत्यंत खूश आहे.

टीम इंडियाने वर्ल्ड कप 2023 मधील आत्तापर्यंतचे दोन्हीही सामने जिंकले आहेत. आता टीम इंडियाचा 14 ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube