World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाचा सलग दुसरा पराभव; दक्षिण आफ्रिकेने 134 धावांनी उडविला धुव्वा

  • Written By: Published:
World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाचा सलग दुसरा पराभव; दक्षिण आफ्रिकेने 134 धावांनी उडविला धुव्वा

AUS vs SA : वर्ल्ड कप (World Cup 2023) जिंकण्याचे मनसुबे घेऊन आलेल्या बलाढ्य ऑस्ट्रेलिया (Australia) संघाला सलग दुसऱ्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पाँइट टेबलमध्ये खातेही उघडू शकलेला नाही. दहाव्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (South Africa) ऑस्ट्रेलियाचा तब्बल 134 धावांनी पराभव केला आहे. याच बरोबर आफ्रिकेने सलग दुसरा विजय मिळविला आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना आफ्रिकेने 7 विकेट गमावून 311 धावा केल्या. त्यात क्विंटन डिकॉकने शानदार शतक झळकविले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया संघ 40. 5 षटकांत 177 धावांत गारद झाला.

World Cup 2023: भारत-पाकिस्तान महामुकाबला; मुंबई-अहमदाबाद विशेष ट्रेन धावणार

आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडासमोर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज चाचपडत खेळत होते. त्याने आठ षटकांत 33 धावा देत 3 विकेट घेतला. याचबरोबर मार्को येनसन, तबरेज शम्सी आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन विकेटस् घेतल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्विंट डिकॉकने जोरदार फटकेबाजी करत शानदार शतक झळकविले. त्याने 106 चेंडूत 109 धावांची जोरदार खेळी केली. त्यात आठ चौकार आणि सहा षटकारांचा समावेश आहे. या वर्ल्ड कपमध्ये डिकॉकने सलग दुसरे शतक झळकविले आहे. त्यामुळे भारताचा मैदानात आता डिकॉक हा इतर संघांसाठी धोकादायक ठरू लागला आहे.

World Cup 2023 : भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियम उडवण्याची धमकी देणाऱ्याला अटक

डिकॉकने तेम्बा बावुमाबरोबर पहिल्या विकेटसाठी 108 धावांची भागिदारी केली. त्यानंतर रासी वॅन डर ड्युसेनने क्विंटनने अर्धशतकीय खेळी केली. तर मार्करमने 44 चेंडूत 56 धावांची खेळी केली. आफ्रिकेविरुद्ध मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेलने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर जोश हेजलवुड, पॅट कमिन्स आणि अॅडम झम्पाने प्रत्येकी एक विकेट घेतली.


पावर प्लेमध्ये ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाची सुरुवातीपासून पडझड झाली. पहिल्या पावर प्लेमध्ये मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव स्मिथ हे तंबूत परतले. त्यानंतर ऑस्ट्रेलिया डाव सांभाळता आला नाही. मार्नस लाबुशेननने सर्वाधिक 46 धावांची खेळी करत संघाला सांभाळण्याचा प्रयत्न केला. मिचेल स्टार्क 27 आणि पॅट कमिन्स 22 धावा करू शकला. बाकीचे फलंदाज वीस धावांही करू शकले नाहीत. त्यामुळे 41 व्या षटकात ऑस्ट्रेलिया संघ 177 धावांत गारद झाला.

पाँइट टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाला नवव्या क्रमांकावर
ऑस्ट्रेलियाचा सलग दुसरा पराभव आहे. भारताने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 6 विकेटने मात दिली होती. आज दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. त्यामुळे पाँइट टेबलमध्ये आफ्रिकेचा चौथ्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलिया थेट नवव्या स्थानावर आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube