World Cup 2023 : भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियम उडवण्याची धमकी देणाऱ्याला अटक

World Cup 2023 : भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियम उडवण्याची धमकी देणाऱ्याला अटक

World Cup 2023 : सध्या भारतात ODI क्रिकेट विश्वचषक (ODI World Cup 2023) खेळला जात आहे. यातील महत्त्वाचा सामना 14 ऑक्टोबर रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. येथे कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानची टक्कर होणार आहे.

यापूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियमवर हल्ल्याची धमकी मिळाली आहे. याप्रकरणी अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका व्यक्तीला अटक केली आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर हल्ल्याची धमकी देणारा ईमेल पाठवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

धमकीचा ईमेल पाठवला
गुजरातमधील राजकोट येथून अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचा यापूर्वी कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. गुजरात पोलीस अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी स्टेडियममध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी अधिक माहिती दिलेली नाही. अटक करण्यात आलेला आरोपी मूळचा मध्य प्रदेशचा आहे. त्याने धमकीचा ईमेल पाठवला होता.

‘तिच्या’ धाडसाला तोड नाही; हमासच्या 24 दहशतवाद्यांना कंठस्नान, जगभरात होतंय कौतुक

सुरक्षेसाठी 11 हजार जवान तैनात करणार
भारत-पाकिस्तान विश्वचषक क्रिकेट सामन्यासाठी अहमदाबाद पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. हा सामना पाहण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. 14 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमच्या सुरक्षेसाठी गुजरात पोलिस, NSG (नॅशनल सिक्युरिटी गार्ड), RAF (रॅपिड अॅक्शन फोर्स) आणि होमगार्ड्सचे 11 हजारहून अधिक जवान तैनात करण्यात येणार आहेत. अशा कडेकोट सुरक्षा व्यवस्थेचा उद्देश कोणताही संभाव्य धोका टाळण्यासाठी आहे जेणेकरून प्रेक्षक सुरक्षित राहतील आणि खेळाचा आनंद घेऊ शकतील.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube