Download App

एका बाजूला राजा, दुसऱ्या बाजूला माथाडी कामगारांचा उमेदवार; साताऱ्याच्या लढतीवर पवारांचं वक्तव्य…

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

Sharad Pawar on Satara Loksabha : श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंत शरद पवा (Sharad Pawar) यांनी अखेर त्यांचे निष्ठावंत शिलेदार आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं. तर महायुतीकडून खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) मैदानात असणार आहे. दरम्यान, साताऱ्याच्या लढतीवर शरद पवारांनी भाष्य केलं.

Anil Kapoor : फ्लाइटमध्ये चाहत्यांनी केला अनिल कपूरवर प्रेमाचा वर्षाव, फोटो व्हायरल 

साताऱ्यात शशिकांत शिंदे हे माथाडी कामगारांमध्ये अनेक वर्षे काम करणारे सहकारी कार्यकर्ते असून त्यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे साताऱ्यात राजा विरुद्ध कामगार नेता, अशी लढत असेल, असं वक्तव्य पवारांनी केलं.

शरद पवार यांनी बारामती येथील गोविंद बाग या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, आमच्या अध्यक्षांनी सातारचा उमेदवार जाहीर केला. माथाडी कामगारांसाठी अनेक वर्षे काम करणाऱ्या सहकाऱ्याला-शशिकांत शिंदेंना पक्षाने तिथं संधी दिली आहे. तिथं मोठी गंमत होणार आहे. एका बाजूला राजा आणि दुसरीकडे माथाडी कामगार म्हणून ज्यांनी काम केलं, असा सर्वसामान्य कुटुंबातला सामान्य उमेदवार अशी ही निडवणूक आहे. लवकरच त्यांचा उमेदवारी अर्ज भरला जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीची मोहिम सुरू होईल, असं पवार म्हणाले.

भाजप कार्यकर्ते श्रीरंग बारणेंना इंगा दाखवणार? बावनकुळे यांच्यासमोरच वाचला तक्रारींचा पाढा 

मोहित-पाटलांच्या उमेदवारीवर पवार काय म्हणाले?
माढा लोकसभा मतदारसंघात तरुणांचा मोठा पाठिंबा असून अकलूजचे काही सहकारी भेटण्यासाठी आले होते. त्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांचे नाव पुढं आले. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष त्यांना अकलूजमध्ये प्रवेश देतील. पक्षप्रवेश केल्यांतर त्यांची उमेदवारी जाहीर होईल,असं पवार म्हणाले.

पुढं बोलतांना पवार म्हणाले की, नामदेव ताकवणे यांनी दौंड तालुक्यात आमच्यासोबत काम करण्याचे ठरवले याचा मला आनंद आहे. भाजपचे अध्यक्ष हेच आमच्या पक्षात येऊन सर्वसामान्यांसाठी काम करण्यास इच्छुक आहेत, ही महत्त्वाची बाब असून नवीन लोक जे येतात, त्यांचे स्वागत करून साखर कारखान्याचे राजकारणात अधिक लक्ष देण्याची आमची भूमिका नाही. हा कारखाना चालवा. शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे, अशी आमची भूमिका असल्याचे पवार म्हणाले.

चंद्रराव तावरे आणि मी एकाच शाळेत शिकलो. सुप्रियाच्या लग्नाला अनेक पाहुणे आले होते. त्या पाहुण्यांची सोय करायला जे आमचे सहकारी पुढे होते, त्यात चंद्रराव तावरे यांचे नाव येते. चंद्रराव तावरे यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार म्हणाले, काळाबरोबर त्यांनी वेगळी भूमिका घेतली. शरद पवार यांनी काकडे कुटुंबीयांच्या भेटीवरही भाष्य केले. शरद पवार म्हणाले, त्या कुटुंबात एक दुःखद घटना घडली म्हणून मी गेलो. बाबा काकडे गेल्यानंतर मी त्यांच्या घरी गेलो होतो. हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे. एखादा कर्तृत्ववान व्यक्ती गेल्यानंतर त्या कुटुंबाचे सांत्वन करणं ही आमची जबाबदरी आहे.

follow us

वेब स्टोरीज