Download App

मुंबईत शरद पवार-अजित पवारांची बैठक, एक तास चर्चा… राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू

अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे पार पडली.

Ajit Pawar Sharad Pawar Meet At Y B Chavan Center Mumbai : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गटांमध्ये विभागला आहे. अजित पवारांचा गट सत्तेत असून, शरद पवारांचा गट विरोधी बाकावर आहे. पक्षाच्या या विभागानंतरही, दोन्ही नेत्यांमध्ये अनेकवेळा भेटी झाल्या असून, त्यांच्या संवादाचे राज्यातील राजकीय वर्तुळात सतत विश्लेषण होत आले आहे.

ही बैठक फक्त राजकीय चर्चेसाठी?

मिळालेल्या माहितीनुसार, नुकतीच अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली, जी मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे पार पडली. काका-पुतण्यांमधील या बैठकीत सुमारे एक तास चर्चा झाली. ही बैठक फक्त राजकीय (Maharashtra Politics) चर्चेसाठी नव्हती, तर माळेगाव सहकारी साखर कारखाना, राज्यातील पूरस्थिती, अतिवृष्टीग्रस्तांसाठी निधी गोळा करण्यासंबंधी उपाययोजना आणि प्रशासकीय मुद्यांवर केंद्रीत होती, असं समोर येतंय.

दोन्ही नेत्यांमध्ये कौटुंबिक विषयांवरही संवाद

या भेटीत शरद पवार यांनी अजित पवार यांना आतापर्यंत (Ajit Pawar Sharad Pawar Meet) झालेल्या पंचनाम्यांची माहिती विचारली. याचवेळी अजित पवार यांनी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मदतीबाबत माहिती दिली आणि पूरग्रस्तांसाठी पुढील उपाययोजनांवर चर्चा केली. याशिवाय, दोन्ही नेत्यांमध्ये काही कौटुंबिक विषयांवरही संवाद झाला, ज्यामुळे ही भेट एकदमच चर्चेचा विषय बनली आहे.

सुमारे एक तास चर्चा

अजित पवार आणि शरद पवार यांची ही भेट पहिली नाही. पूर्वीही विविध कार्यक्रमांमध्ये दोघे एकत्र दिसले आहेत. काही कौटुंबिक कार्यक्रम आणि राजकीय बैठकींमध्ये ते एकत्र आलेले आहेत. मध्यंतरी एकत्रिकरणाच्या चर्चांना जोर आला होता, परंतु नंतर त्या मागे पडल्या. आता पुन्हा एकदा सुमारे एक तास चर्चा झाल्यामुळे, पक्षातील गटांमधील संवाद आणि राज्यातील पूरस्थितीवरील उपाययोजना यावर लक्ष केंद्रीत झाले आहे.

राज्यातील राजकीय वर्तुळात या भेटीमुळे मोठा गदारोळ निर्माण झाला असून, भविष्यात अजित-पवार आणि शरद पवार यांच्यातील संवाद कसा पुढे जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us