Download App

Anil Kapoor : फ्लाइटमध्ये चाहत्यांनी केला अनिल कपूरवर प्रेमाचा वर्षाव, फोटो व्हायरल

  • Written By: Last Updated:

Anil Kapoor : अनिल कपूर (Anil Kapoor) हे बॉलिवूडमधी (Bollywood) एक एव्हरग्रीन अभिनेते आहेत. गेली अनेक वर्ष ते आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. त्याची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. ‘ॲनिमल’ आणि ‘फाइटर’ सारखे हिट सिनेमा देणारे अनिक कपूर विमानाने प्रवास करतांना चाहत्यांनी त्यांच्या भोवती गराडा घातला. याने ते भारावून गेले.

भाजप कार्यकर्ते श्रीरंग बारणेंना इंगा दाखवणार? बावनकुळे यांच्यासमोरच वाचला तक्रारींचा पाढा 

अनिल कपूर यांनी वयाची साठी ओलांडूनही ते तिशीतल्या तरुणासारखेच दिसतात आणि त्यांचा फिटनेस तर भल्याभल्यांना लाजवेल असा आहे. त्यामुळं त्यांच्याविषयी चाहत्यांना कमालीचं कौतुक आणि प्रेम आहे. याचा अनुभव नुकताच त्यांना आला. अनिल कपूर हे एका कार्यक्रमासाठी प्रवास करण्यासाठी निघालेल्या विमानात चाहत्यांनी त्यांच्या भोवती गराडा घातला आणि सेल्फी घेण्याचा हट्ट केला. आपल्या चाहत्यांचा हट्ट अनिक कपूर यांनी आपुलकीने पूर्ण केला. फ्लाईटमधले अनिल कपूर यांचे फोटोज् सोशल मीडिया वर व्हायरल झाले आहेत.

सांगलीत नवा डाव! महाविकास आघाडीला धक्का देत विशाल पाटील भरणार अपक्ष अर्ज… 

कामाच्या आघाडीवर अनिल कपूर स्टारर ‘ॲनिमल’ आणि ‘फाइटर’ केवळ बॉक्स ऑफिस हिट म्हणून उदयास आले नाहीत, तर ते ओटीटी प्लॅटफॉर्मवर विक्रम करत आहेत.

दरम्यान, अनिल कपूर यांचे समवयीन कलाकारांनी अभिनेत्रींनीही अभिनय सोडला आहे. पण अनिल कपूर अजूनही इतके यंग आणि फटि आहेत की, ते आजही नवख्या हिरोंना टक्कर देतात. आजही आपल्या अभिनयाने प्रेईक्षकांचं मनोरंजन करत असतात. अनिल कपूर हे आपल्या आगामी ‘सुभेदार’ नावाच्या रिलीजसाठी सज्ज आहेत, ज्याचे दिग्दर्शन सुरेश त्रिवेणी करणार आहेत.

follow us

वेब स्टोरीज