Fighter Break Record: अनिल कपूरने मोडला स्वतःचाच रेकॉर्ड! नेटफ्लिक्सवर ‘फाइटर’ने रचला नवा विक्रम
Anil Kapoor Fighter Break Record: मेगास्टार अनिल कपूर (Anil Kapoor) चर्चेत असून ‘फाइटर’ (Fighter Movie) आणि ‘ॲनिमल’ सोबत बॉक्स ऑफिसवर (box office) बॅक टू बॅक हिट्स दिल्यानंतर, सिनेमाचा आयकॉन OTT वर स्वतःचा यशाचा विक्रमही मोडत आहे. अभिनेत्याचा ‘फायटर’ चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नेटफ्लिक्सच्या पहिल्या स्थानावर प्रदीर्घ काळ ट्रेंड केल्यानंतर, एरियल ॲक्शनरने ‘ॲनिमल’ आणि ‘डंकी’ला मागे टाकून OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्यापासून 10 दिवसांत 12.4 दशलक्ष व्ह्यूज मिळवणारा सर्वात वेगवान बॉलिवूड चित्रपट बनला आहे.
बॉक्स ऑफिसवरही, ‘फाइटर’ला जगभरात 337 कोटी रुपयांच्या अंदाजे कलेक्शनसह जबरदस्त प्रतिसाद मिळाला. आता, कामाच्या आघाडीवर, दादासाहेब फाळके विजेते अभिनेते साइन करण्याच्या मोहिमेत आहेत. सध्या तो सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित ‘सुभेदार’ या शीर्षकाची तयारी करत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती.
या चित्रपटात हृतिक रोशन, दीपिका पदूकोण व अनिल कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने दीपिका व हृतिक ही जोडी प्रथमच पडद्यावर दिसली आहे. चित्रपटातील त्यांच्यातील केमिस्ट्रीची जबरदस्त चर्चा होती. या चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंटदरम्यान हृतिक रोशनने अनिल कपूर यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं जे ऐकून अनिल कपूर यांच्या डोळ्यात पाणी आलं. मीडियाशी संवाद साधताना हृतिकने अनिल कपूर यांच्या कामाची प्रशंसा केली, इतकंच नव्हे तर त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.
हृतिकने त्याचे वडील राकेश रोशन यांच्या अनेक सिनेमात सहाय्यक म्हणून काम केलं आहे. त्यापैकी ‘खेल’ आणि ‘कारोबार’ या सिनेमात अनिल कपूर होते अन् त्यावेळी एक सहाय्यक दिग्दर्शक म्हणून हृतिकला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. त्याचीच आठवण हृतिकने काढली. पुढे तो म्हणाला की, “मी अनिल सरांना सेटवर पाहतच मोठा झालो आहे. फायटरच्या वेळी चित्रीकरण करताना पुन्हा तोच जुना काळ डोळ्यासमोर उभा राहीला. “एक सहाय्यक म्हणून काम करताना अनिल सरांना पाहून त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी मला पुन्हा नव्याने शिकता आल्या. माझ्यासाठी ते एक प्रेरणास्थानच आहेत.