Sachin Pilgaonkar On Lok Sabha Elections : सचिन पिळगावकर निवडणुकीच्या रिंगणात, शिंदे गटाकडून ऑफर? म्हणाले,”मी लोकसभा निवडणुकीत…”

Sachin Pilgaonkar On Lok Sabha Elections : सचिन पिळगावकर निवडणुकीच्या रिंगणात, शिंदे गटाकडून ऑफर? म्हणाले,”मी लोकसभा निवडणुकीत…”

Sachin Pilgaonkar On Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर आता मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी प्रचाराची सुरुवात केली आहे. तर काही राजकीय पक्ष या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) रिंगणात काही बॉलीवूड स्टार्सना (Bollywood stars) उतरवत आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे यावेळीही सत्ताधारी भाजपकडून (BJP) अनेक बॉलीवूड स्टार्सना तिकटी देण्यात आलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने (Shiv Sena) देखील बॉलीवूड अभिनेता गोविंदाला पक्षात प्रवेश दिला आहे.

माहितीनुसार, तो शिंदे गटाच्या तिकिटावर मुंबईत निवडणूक लढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मराठी अभिनेता सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) देखील लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदे गटाकडून रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. मात्र आता सचिन पिळगावकर यांनी याबाबत एक फेसबुक पोस्ट (Facebook Post) करत तो निवडणूक लढवणार की नाही हे स्पष्ट केले आहे.

त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मी लोकसभा निवडणुकीत उतरतोय ही अफवाह माझ्या कानावर ही आली…मी हसलो, एवढंच सांगू शकतो की मी कोणत्याही पक्षाचा नाही, मी फक्तं आहे माझ्या प्रेक्षकांचा….६१ वर्ष आपला, सचिन पिळगांवकर”, यामुळे आता तो निवडणुकीत उतरणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

काही दिवसांपासून सोशल मीडियावर लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक मराठी कलाकार निवडणूक लढवणार यांची चर्चा होती. या कलाकारांमध्ये शरद पोंक्षे, सचिन खेडेकर आणि सचिन पिळगावकर या तीन नावांच्या चर्चा सर्वात जास्त सुरु होती.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात नवीन ट्विस्ट! AlMIM देणार उमेदवार, फटका कोणाला?

मात्र आता सचिन पिळगावकर यांनी ते निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केले आहे तर अद्याप शरद पोंक्षे किंवा सचिन खेडेकर यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे येण्याऱ्या दिवसात ते राजकारणात एंट्री करणार का? हे पाहावे लागेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube