Dombivli Assembly Constituency: 2009 मध्ये कल्याण विधानसभा मतदारसंघाचं विभाजन होऊन डोंबिवली (Dombivli Assembly Constituency) हा स्वतंत्र मतदारसंघ अस्तित्वात आला.तेव्हापासून मतदारसंघात भाजपचे (BJP) वर्चस्व राहिले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा विचारसरणीचा प्रभाव असलेले शहर म्हणून डोंबिवलीची जनसंघापासून ओळख राहिलेली आहे. हा मतदारसंघ बुद्धीजीवी आणि श्रमजीवी अशा मतदारांचा आहे. या मतदारसंघात मराठी, गुजराती, मारवाडी, दाक्षिणात्य, उत्तर भारतीय असे बहूभाषिक लोक राहतात. त्यातून एकगठ्ठा मतदान भाजपला होतंय. महानगरपालिकेतून राजकारणाला सुरुवात करणारे रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) हे येथून सलग तीन वेळेस निवडून आले आहेत. यंदा विजयाचा चौकार मारण्यासाठी चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सार्वजनिक बांधकाममंत्री म्हणून राज्यात रस्त्यांचे जाळे विणणाऱ्या रविंद्र चव्हाणांची राजकीय कारकीर्द, डोंबिवलीत विकासकामे झाली का ? याबाबत जाणून घेऊया…
रविंद्र चव्हाणांची राजकीय कारकीर्द
रविंद्र चव्हाण यांचा राजकीय प्रवास पाहिला, तर चव्हाण यांच्याकडे भाजपने 2002 साली कल्याण युवामोर्चा उपजिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली होती. 2005 साली सावरकर रोड वॉर्डमधून काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत ते कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत गेले. 2007 मध्ये ते स्थायी समिती सभापती झाले. त्यातून त्यांनी डोंबविली शहरात विकासकामे केली. 2009ला कल्याण विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन डोंबिवली हा स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला. 2009च्या विधानसभा निवडणुकीत नव्याने तयार झालेल्या डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून त्यांना भाजपने संधी दिली. पहिल्याच विधानसभा निवडणुकीत त्यांनी मोठा विजय मिळवला. 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये डोंबिवली मतदारसंघातून सलग विजयी होऊन त्यांनी हॅटट्रीक साधली. त्यांनी महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण व बंदरे या खात्यांचं राज्यमंत्रीपदही सांभाळ आहे. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेटमंत्री झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सार्वजनिक बांधकाम, अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण खात्याचे ते कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली. मतदारसंघाशी असलेल्या त्यांच्या कनेक्टच्या जोरावर मतदारसंघात ‘रविदादा’ नावाने ते ओळखले जातात.
मतदारसंघात रस्त्यांचे जाळे
महाविकास आघाडी सरकारच्या काळात रखडलेल्या आपल्या कल्याण-डोंबिवलीतील विकासाला महायतुती सरकारच्या काळात गती मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना सरकारने डोंबिवलीतील रस्त्यांसाठी जो 443 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता तो महाविकास आघाडी सरकारच्या काळात स्थगित करण्यात आला होता. परंतु महायुती सरकार सत्तेत येताच आमदार रविंद्र चव्हाणांच्या पाठपरुवठ्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील विकासाला रस्त्यांसाठी 500 ते 550 कोटींचा निधी वर्ग होऊन कामे सुरू झाली आहेत.
रविंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नाने डोंबिवलीची शैक्षणिक प्रगतीही वेगाने
डोंबिवली पश्चिम येथील शास्त्रीनगर येथे वैशालीताई जोंधळे लॉ कॉलेज, एस व्ही जोशी विद्यासंकुल येथे जीआय लॉ कॉलेज, टिळकनगर महाविद्यालय येथे लॉ कॉलेज, टिळकनगर कॉमर्स कॉलेजमध्ये बीएएफ आणि बीएमएस हे व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. शिरोडकर नर्सिंग कॉलेजमध्ये बीएससी नर्सिंग आणि फिजिओथेरपी कॉलेज ला मान्यता मिळाली.
मतदारसंघात कॅन्सर हॉस्पिटल
डोंबिवली शहराच्या इतिहासात काही रस्ते आणि काही वास्तूंना विशेष स्थान आहे. टिळक रोडवरची सूतिकागृहाची वास्तूंना विशेष स्थान आहे. टिळकररोडवरची सूतिकागृहाची वास्तू त्यातील एक आहे. या ठिकाणी नवे भव्य सूतिकागृहाची वास्तू उभारली जाणार आहे. त्यात ठिकाणी कॅन्सर उपचार वार्ड उभारण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना डोंबिवलीत कॅन्सरवरील उपचार मिळणार आहेत. सार्वजनिक आणि खासगी तत्त्वावर मॉर्डन मॅटर्निटी होम आणि कॅन्सर हॉस्पिटल उभारणार आहेत. तसेच महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात शवविच्छेदन केंद्र आणि नवजात शिशुंसाठी अतिदक्षता विभागाचे लोकार्पण करण्यात आले.
गणेश घाट
मरिटाइम बोर्ड आणि जिल्हा नियोजनाचा निधी रविंद्र चव्हाणांनी आणला आहे. त्यातून गणेशनगरला 15 कोटी, कुंभारखान पाडासाठी 10 कोटी, जुनी डोंबिवलीसाठी 15 कोटींचा निधी आणला. गणेशनगर भागात एक कोटी रुपये मंजूर करून सुसज्ज अशी स्मशानभूमी मंजूर करण्यात आली.
डोंबिवलीकरांसाठी आधुनिक रेल्वेसेवा
डोंबिवलीतून मुंबईत जाणारा नोकर वर्ग मोठा आहे. त्यांना चांगली सुविधा मिळविण्यासाठी मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनच्या अंतर्गत मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट या योजनेतून डोंबिवली रेल्वेस्थानक सुधारणा प्रस्तावाला मान्यता मिळालीय.
मेट्रो प्रकल्प
5 हजार 865 कोटी रुपये खर्चून मेट्रो प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे कल्याण-डोंबिवली-नवी मुंबई असा प्रवास करणाऱ्या नागरिकांना स्वस्त, वेगवान आणि सुखकर प्रवास मिळणार आहे.
भिवंडी कल्याण-शीळफाटा मार्ग
भिवंडी-कल्याण-शीळफाटा या मार्गावर होणारी वाहतूक कोंडी हा नेहमीच मोठा प्रश्न होऊन बसला होता. या रस्त्याने सहा पदरी रुंदीकरण करण्याच्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आलीय. तसेच 561 कोटी 85 लाख रुपयांची तरदूत देखील करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हे काम आता मार्गी लागले आहे. याचबरोबर अनेक विकासकामे त्यांनी केली आहेत. याच कामांच्या जोरावर मतदारसंघातून चौथ्यांदा बाजी मारण्याचा विश्वास रविंद्र चव्हाण यांना आहे.
“राज्यात 2014 साली जेव्हा भाजपाची सत्ता आली तेव्हा देवेंद्रजींना सांगितलं की भाजपाची विचारधारा मानणाऱ्या डोंबिवलीला आता पायाभूत सुविधांसाठी निधीचा मोठा हिस्सा मिळायला हवा त्यातून आता दिसतय ते डोंबिवलीच्या कनेक्टिव्हिटीचे पर्व सुरु झाले. मोठागाव माणकोली ब्रिज, कल्याण शीळ रोड विस्तारीकरण, मेट्रो आणि अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी 471 कोटीचा निधी. काँग्रेसने कायम निधी वाटपात डोंबिवलीला दुर्लक्षित केले कारण हा मतदारसंघ भाजपा विचारांचा आहे पण महायुतीचं उजव्या विचारसरणीचं सरकार आल्याने हे सर्व शक्य झालं” असं चव्हाण त्यांच्या मुलाखतीत वारंवार सांगताना दिसतात.