Devendra Fadanvis On Rohit Pawar: मोक्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaiwal) हा खोटी माहिती देऊन बनावट पासपोर्ट मिळवून देशातून फरार झालाय. तर त्याचा भाऊ सचिन घायवळच्या पिस्तूल परवाना मिळविण्याचे प्रकरण गाजत आहे. त्यावरून विरोधकांनी सरकारवर आरोप सुरू केले आहे. राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) व विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्यामध्ये यावरून जोरदार संघर्ष सुरू आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी या प्रकरणावरून रोहित पवारांकडे बोट दाखविले.
जालन्याकडे येत असलेल्या रक्कम पोलिसांनीच लुटली; तीन कोटी घेतले अन् कागदावर दीड कोटीच दाखवले
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचे दृष्टीने भाजपची पुण्यात बैठक झाली. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारशी बोलताना घायवळ प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. फडणवीस म्हणाले, घायवळ प्रकरणाची सुरुवात कुठून झाली हे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. ( Devendra Fadanvis On Rohit Pawar Nilesh Ghaiwal Passport)
घायवळवर कुठलाही गुन्हा नाही, असा अहवाल कसा आला ?
निलेश घायवळ याने पासपोर्ट मिळविण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यात अर्ज केला. त्यावेळी तेव्हाच्या नेत्याच्या राजकीय दबावापोटी त्याला पोलिसांनी क्लीनचिट दिली. तसा अहवाल सादर केला. घायवळवर कुठलाही गुन्हा नाही, असा अहवाल आहे. ते तेथे राहत नसल्याने पोलिसांचा अहवाल आला पाहिजे होतो. परंतु तसा अहवाल आला नाही. त्यामुळे पासपोर्ट मिळाला आणि तो पळून गेला होता. तेव्हा कुणाचा दबाव होता. निवडणुकीत त्याने कुणाचे काम केले होते. कुणाचा आशीर्वाद होता हे सगळे समोर यायला हवे, असे फडणवीस यांनी म्हटलंय.
घायवळला सरकारचं पाठबळ, रोहित पवारांचा आरोप
आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पत्रकार परिषद घेत घायवळला कुणाच्या काळात पासपोर्ट मिळाला, असे सांगत आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप केले होते. त्याला लगेच रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे. सिद्धार्थ शिरोळे हे अभ्यासू आमदार आहेत. पण यावेळी त्यांच्या नेत्यांनी त्यांना काही कागद दिले आणि वाचायला सांगितले. त्यांनी अभ्यास न करता पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे त्यांना प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. गुंडाच्या समर्थनात भाजप मैदानात उतरलं आहे, ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. तसेच तेव्हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहराज्यमंत्री राम शिंदे हे होते, असेही रोहित पवारांनी म्हटलंय.