The single lane work will be completed by Ganeshotsav; Minister Ravindra Chavan : गणेशोत्सव (Ganeshotsav) हा कोकणवासीयांसाठी महत्त्वाचा सण आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून मुंबई-गोवा महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. येत्या गणेशोत्सवापर्यंत सिंगल लेन आणि डिसेंबर २०२३ पर्यंत रस्ता पूर्ण होणार आहे. त्यामुळं गणेशोत्सवाला जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan)यांनी आज व्यक्त केला.
https://www.youtube.com/watch?v=BkgtkczyUvE
महामार्गावर अनेक ठिकाणी ब्लॅक स्पॉट आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी इन्सुली आणि झाराप या दोन्ही ठिकाणी होणाऱ्या पुलांसाठी 68 कोटी, तर जुन्या रस्त्यांवर व्हाईट टॉपिंगसाठी 38 कोटी मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. ते म्हणाले की, आंबोली-रेड्डी रस्ता कॉंक्रिटीकरण प्रस्ताव पाठवला आहे, त्यामुळे लवकरच या रस्ताचा प्रश्नही मार्गी लागेल, असं त्यांनी सांगिलतं.
पालकमंत्री चव्हाण यांनी आज सकाळी झाराप येथून मुंबई-गोवा महामार्गाच्या पाहणीला सुरुवात केली. यावेळी प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, माजी आमदार राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती कॉ. बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते. या पाहणीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
राहुल गांधी सॅन फ्रान्सिस्कोत दाखल पण विमानतळावर दीड तास ताटकळले
पत्रादेवी ते झाराप आणि सावंतवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यामुळे झाराप तिठ्यावर अपघात होत होते. या जागेसोबतच इन्सुली येथील पुलाचे कामही मंजूर झाले असून ते लवकरच पूर्ण होईल, असे पालकमंत्री चव्हाण यांनी सांगितले. त्यासाठी व्हाईट टॉपिंगलाही मान्यता देण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्य आणि कंत्राटदार यांचीही मेहनत यासाठी असल्याचेही ते म्हणाले.
कुडाळ येथील आरएसएन हॉटेलजवळ होणारे अपघात रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधींकडून होत होती. पालकमंत्री चव्हाण यांनी या जागेची पाहणी करून तेथे आयलॅंड करण्याचे निर्देश दिले. वेताळ बोंबार्ड येथील प्रलंबित भूसंपादन प्रस्ताव आठवडाभरात पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिले.
कणकवली-वागडे फाट्याची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री चव्हाण म्हणाले, हा ब्लॅकस्पॉट आहे. या ठिकाणी अपघात झाले आहेत. हे अपघात टाळण्यासाठी येथे मोठे आरसे लावा आणि काही नवीन बदल करायचे असतील तर ते करा. यासाठी नवीन प्रस्ताव करायला हरकत नाही, पण ठोस उपाययोजना करा, असे निर्देश दिले. यावेळी आमदार नितेश राणे, संदेश पारकर हे देखील उपस्थित होते.