राहुल गांधी सॅन फ्रान्सिस्कोत दाखल पण विमानतळावर दीड तास ताटकळले

राहुल गांधी सॅन फ्रान्सिस्कोत दाखल पण विमानतळावर दीड तास ताटकळले

Rahul Gandhi America Visit: काँग्रेस नेते राहुल गांधी आज (30 मे) अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे पोहोचले आहेत. यावेळी राहुल गांधी काळ्या टी-शर्टमध्ये दिसत आहेत. सामान्य पासपोर्ट असल्याने राहुल गांधींना सॅन फ्रान्सिस्को विमानतळावर सामान्य प्रक्रियेनुसार निघण्यास सुमारे दीड तास लागला. राहुल गांधींचे अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये कार्यक्रम आहेत.

राहुल गांधी 4 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये भारतीय वंशाच्या लोकांना संबोधित करणार आहेत. ते सॅन फ्रान्सिस्को येथील प्रतिष्ठित स्टॅनफोर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच वॉशिंग्टनमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर काही कायदेतज्ज्ञ आणि थिंक टँक यांच्यासोबत बैठक घेणार आहेत.

पवारांचा प्लॅन लक्षात येताच नाना पटोलेही झाले सावध; 2 आणि 3 जूनला महत्वाची बैठक

राहुल गांधी त्यांच्या आठवडाभराच्या अमेरिका दौऱ्यात भारतीय अमेरिकनांना संबोधित करणार आहेत. त्यांचा हा दौरा 4 जून रोजी न्यूयॉर्कमधील कार्यक्रमात सहभागी होऊन संपेल. यापूर्वी, दिल्लीच्या स्थानिक न्यायालयात ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) जारी झाल्यानंतर दोन दिवसांनी रविवारी (28 मे) राहुल गांधींना नवीन सामान्य पासपोर्ट मिळाला होता. राहुल गांधींना खासदार म्हणून दिलेला डिप्लोमॅटिक पासपोर्ट जमा केल्यानंतर त्यांनी सामान्य पासपोर्टसाठी अर्ज केला होता.

गुजरातमधील सुरत येथील न्यायालयाने मानहानीच्या आरोपाखाली राहुल गांधी यांना खासदार म्हणून अपात्र ठरवले होते. यानंतर राहुल गांधींनी राजनैतिक प्रवासाची कागदपत्रे परत केली होती. दिल्ली न्यायालयाने राहुल गांधींना 10 वर्षांच्या ऐवजी तीन वर्षांसाठी सामान्य पासपोर्ट जारी करण्यासाठी एनओसी जारी केली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube