पवारांचा प्लॅन लक्षात येताच नाना पटोलेही झाले सावध; 2 आणि 3 जूनला महत्वाची बैठक
Constituency wise review meeting of Congress on June 2 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) जागावाटपावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू आहे. अनेक जागांवर कॉंग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीकडून (NCP) दावा सांगितल्या जातोय. अशातच आज राष्ट्रवादीने पक्षाची लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा आज घेतली. त्यानंतर आता कॉंग्रेसनेही राज्यातील लोकसभेच्या 42 मतदारसंघांची आढावा बैठक 2 व 3 तारखेला मुंबईतील टिळक भवनात आयोजित केली आहे.
https://www.youtube.com/watch?v=BkgtkczyUvE
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जोरदार तयारी केली आहे. त्यासाठी आता कॉंग्रेसने मतदारसंघनिहाय आढावा बैठक बोलावली आहे. संबंधित मतदारसंघात काँग्रेसची ताकद किती आहे, कोणता मतदारसंघ काँग्रेससाठी राखून ठेवायचा, अन् कोणता मित्रपक्षांना सोडायचा, याबाबत स्थानिक नेत्यांची मते जाणून घेतली जाणार असून, त्या आधारेच काँग्रेस जागावाटपाची रणनीती आखणार आहे.
Wrestlers Protests :कुस्तीपटूंसाठी शेतकरी नेता मैदानात, सरकारला दिला अल्टिमेटम
या बैठकीलाप्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह तीन माजी मुख्यमंत्री, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आदी नेते उपस्थित राहणार आहेत. 2 जून रोजी विदर्भातील दहाही मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. दुपारी दीड वाजता बुलढाणा मतदारसंघातून विदर्भाची सुरुवात होईल. यानंतर अकोला, अमरावती, यवतमाळ-वाशीम, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर, भंडारा गोंदिया, वर्धा, नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघावर चर्चा होणार आहे. माजी मंत्री, खासदार, आमदार, प्रमुख नेते, जिल्हा प्रभारी, सहप्रभारी, 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून पराभूत झालेले उमेदवार, जिल्ह्यातील विविध आघाड्यांचे अध्यक्ष आणि विभागप्रमुखांना उपस्थित राहण्याच्या सूचना प्रदेश काँग्रेसकडून देण्यात आल्या.
गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील चंद्रपूरची एकमेव जागा काँग्रेसला जिंकता आली. ही परिस्थिती सुधारण्यासाठी कॉंग्रेसकडून ताकत लावली जातेय.