मला आमदार होऊ द्यायचं नव्हत त्यांनी मी मंत्री झालो…, फडणवीसांच्या वक्तव्यानंतर कदमांचं ट्वीट

राजकारणात सर्वच गोष्टींचा सामना करावा लागतोच. पण अशा राजकारणामुळे मी आजवर कधीच विचलित झालो नाही आणि पुढेही होणार नाही.

Ygehhhs

Ygehhhs

गेली काही दिवसांपासून सचिन घायवळ प्रकरण तापलं आहे. (Ghaywal) त्यावरून गृहरांज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर आरोप होत आहेत. दरम्यान, या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाष्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्यानतर लगेच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपली बाजू ट्वीटरवरून मांडली आहे.

राजकारणात सर्वच गोष्टींचा सामना करावा लागतोच. पण अशा राजकारणामुळे मी आजवर कधीच विचलित झालो नाही आणि पुढेही होणार नाही. मी माझं काम, माझी जबाबदारी आणि माझं कर्तव्य प्रामाणिकपणे निभावत आहे आणि पुढंही तसंच निभावत राहणार असल्याचं वक्तव्य गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलं.शेवटी असंच म्हणावं वाटतं की, छोटी मोठी वादळं उठली म्हणून पर्वत हलतो असं नाही असं कदम म्हणाले आहेत.

दुसऱ्याची प्रतिमा मलिन करण्याच्या नादात, राजकारणात सक्रिय नसलेल्या माझ्या आईलादेखील या राजकारणात ओढून नीचपणाचा कळस गाठला गेला. व्यक्तीबद्दल मनात असलेला द्वेष काही जणांना राजकारणात इतक्या खालच्या पातळीवर घेऊन येईल, अशी कल्पनादेखील केली नव्हती असं वक्तव्य गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलं.

Video : मुख्यमंत्र्यांकडून गृहराज्यमंत्री कदमांना; क्लीन चीट घायवळच्या शस्त्र परवान्याबद्दल मोठा खुलासा

2019 पासून माझी राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याचा प्रयत्न काहीजण करत आले आहेत. तरीसुद्धा सच्च्या शिवसैनिकांच्या जोरावर मी निवडून आलो. सत्तेतला आमदार म्हणून जनतेच्या अपेक्षा माझ्याकडून वाढल्या. परंतु, तेव्हादेखील ज्या विरोधकाला आम्ही पराभूत केलं, त्यालाच ताकद देण्याचं काम काही जणांनी केलं. स्वतःच्या पक्षातील आमदाराला संपवण्याचा प्रयत्न काहीजण तेव्हापासूनच करत होते असंही कदम म्हणाले.

नुकत्याच झालेल्या 2024 च्या निवडणुकीत माझ्या कुटुंबियांचा स्वतःच्या वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी वापर करून घेण्याइतपत राजकारणाची पातळी घसरली गेली. मला पराभूत करण्यासाठी त्यांनी समाज, पैसा आणि जातीच्या आधारावर गलिच्छ राजकारण करण्याचे अनेक प्रकार केले. माझी वैयक्तिक बदनामी करण्याच्या हेतूने माझ्या खासगी आयुष्यातही ढवळाढवळ करण्याचा काही जणांनी प्रयत्न केल्याचे योगेश कदम म्हणाले आहेत. ज्यांना मला आमदार म्हणून पाहण्याचीही इच्छा नव्हती, त्यांना मी मंत्री झालो हे कसं बघवणार असा टोलाही कदम यांनी लगावला आहे.

Exit mobile version