जामखेडमधील रेणुका कला केंद्रावर राडा ! नर्तकीने छेडछाडीची तक्रार दिला म्हणून जमावाचा कोयत्याने हल्ला

Renuka Kalakendra: तीन दिवसांपूर्वी रेणुका कलाकेंद्रावर आष्टी (जि. बीड) येथील तीन व जामखेड येथील एक जणांनी धुडगूस घातला होता.

  • Written By: Published:
Outrage at Renuka Kala Kendra in Jamkhed! Mob attacks dancer,she complains of harassment

अहिल्यानगर: राज्यातील कला केंद्र हे वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. अहिल्यानगरमधील (Ahilyanagar)जामखेड तालुक्यातील मोहा येथील रेणुका कलाकेंद्रावर (Renuka Kalakendra) 17 जणांच्या जमावाने तलवार, काठ्या, कोयते घेऊन प्रवेश करत तोडफोड केली आहे. या प्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात 17 जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत अमेरिकेतील संबंध ताणलेले; ‘त्या’ अधिकाऱ्यांसाठी ट्रम्प यांचा मोदींना फोन

रेणुका कलाकेंद्रात (Renuka Kalakendra) गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात 17 जणांच्या जमावाने तोंडाला रूमाल लावून तलवार, काठ्या, कोयते घेऊन आले. त्यांनी कलाकेंद्राच्या आवारातील दुचाकी व रिक्षा यांची तोडफोड केली. गेटवर असलेल्या किराणा दुकानाचे काऊंटर फोडून कलाकेंद्रात प्रवेश करून तेथील होम थिएटर व लोकांना बसण्यासाठी ठेवलेल्या 50 खुर्च्याची तोडफोड केली. सुमारे वीस मिनिटे असा प्रकार चालू होता. ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी घटनास्थळी भेट दिली. तोपर्यंत सर्व अज्ञात जमाव चारचाकी वाहनातून बीडच्या दिशेने निघून गेले. तीन दिवसांपूर्वी रेणुका कलाकेंद्रावर आष्टी (जि. बीड) येथील तीन व जामखेड येथील एक जणांनी धुडगूस घातला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. काही जणांनी कलाकेंद्राचालकाकडे खंडणी मागितली होती, असा गुन्हा आहे. (Outrage at Renuka Kala Kendra in Jamkhed! Mob attacks dancer,she complains of harassment)


निलेश घायवळच्या मामांचा धक्कादायक दावा; आमदार रोहित पवारांवर केला गंभीर आरोप

याप्रकरणी कला केंद्र चालक ज्योती पवार यांनी फिर्याद दिली. रेणुका कलाकेंद्रात शुभम लोखंडे, सतीश टकले, नागेश रेडेकर सर्व (रा. आष्टी जि. बीड) व अक्षय मोरे (चिंग्या) या आरोपींनी हातातील कोयत्याने रेणुका कलाकेंद्रातील खुर्च्या, टेबल व दोन चाकी मोटारसायकल स्कुटीची तोडफोड केली. कलाकेंद्रातील नृत्यकाम करणाऱ्या मुलींची छेडछाड केल्याबाबत पहिला गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुरुवारी रात्री रेणुका कलाकेंद्रात तीन चारचाकी वाहनातून अनेक जण आले. 17 जण तोंडाला बांधून गाडीमधून खाली उतरून हातात काठ्या, तलवार, कोयते घेवून कलाकेंद्राचे आवारात लावलेले रिक्षा व तीन मोटार सायकल वाहनाची तोडफोड केली.


भितीने कला केंद्राच्या एका रुममध्ये लपून बसलो

जमावाच्या भितीनी आम्ही कला केंद्राच्या एका रूममध्ये लपून बसलो. पोलीसांना फोन केला असता जमाव चारचाकी वाहनातून सौताडाच्या दिशेने पळून गेला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.

follow us