निलेश घायवळच्या मामांचा धक्कादायक दावा; आमदार रोहित पवारांवर केला गंभीर आरोप

जानकीराम अण्णा गायकवाड यांनी म्हटले की, सचिन घायवळ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये उभा राहणार होता. शिवाय तो जिंकूनही येणार होता.

  • Written By: Published:
Ghaywal

सध्या गुंड निलेश घायवळ आणि बंधू सचिन घायवळ विविध कारणामुळे चर्चेत आहेत. (Pune) त्यांचं वास्तव्य जरी पुण्यात असलं तरीही त्यांचं मूळगाव अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यातील सोनेगाव आहे. सोनेगाव येथे त्यांचा बंगला आणि शेती आहे. मात्र, सध्या त्यांच्या बंगल्याला कुलूप असून इथे परिवारातील कोणताही सदस्य राहत नाही. गावाकडे ते कधीतरी येत असतात. निलेश घायवळ विदेशात पळून गेल्याने आता या प्रकरणात धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत.

नुकताच निलेश घायवळचे मामा जानकीराम अण्णा गायकवाड यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. हेच नाही तर या प्रकरणात आमदार रोहित पवार यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केली असून रोहित पवारच हे सर्व घडून आणत असल्याचे त्यांनी म्हटले. मामा गायकवाड यांनी चक्क निलेश घायवळ आणि सचिन घायवळ दोघेही देवमाणूस असल्याचे म्हटले. रोहित पवार फसवण्याचे काम करत असून ते सर्व षडयंत्र का रचत आहेत, याचाही खुलासा मामांनी केला.

आमच्या मुलाला खोट्या गुन्ह्यांत अडकवलं! निलेश घायवळच्या आई-वडिलांचे गंभीर आरोप, राजकारणी

जानकीराम अण्णा गायकवाड यांनी म्हटले की, सचिन घायवळ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये उभा राहणार होता. शिवाय तो जिंकूनही येणार होता. मात्र, सचिन आणि निलेशच्या बाबतीत रोहित पवार हे सर्वकाही करत आहेत. सचिन आणि निलेशच्या स्वभाव देवासारखा आहे, जो त्यांच्याजवळ येतो तो त्यांचा होऊन जातो. सचिन घायवळ निवडून येणार असल्यानेच हे सर्व करण्यात आलंय. पुढं त्यांनी म्हटले की, रोहित पवारच सर्वकाही करत आहेत, फक्त इतकेच म्हणणे आहे की जे काही करायचे ते खरे करा खोटे नको. निलेश घायवळला अमरावती जेलमधून काढण्यासाठी आमदार रोहित पवारांनीच प्रयत्न केले होते.

सचिन घायवळ निवडणुकीत उभे राहायचं होतं म्हणून अडकवण्याचा प्रयत्न केला. दोघांचाही शिक्षण पुण्यात झाले असून वडील पुण्यात नोकरीला असल्याने ते लहानपणापासून पुण्यातच राहिले आहेत. सचिन घायवळवर गंभीर गुन्हे दाखल असल्यामुळे त्याला शस्त्र परवाना देण्यात आला नाही. गृहखात्याला आम्ही तसाच अहवाल दिला होता. गृह राज्यमंत्र्यांकडून फक्त योग्य ती कारवाई करण्याचे आदेश होते परवाना देण्याचे आदेश नव्हते. त्यामुळे आम्ही परिस्थिती पाहून सचिन घायवळला शस्त्र परवाना दिला नाही. त्यामुळे सचिन घायवळच्या शस्त्र परवान्यासाठी कुणाचीही शिफारस नाही. निलेश घायवळला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही पोलिसांनी म्हटलं.

follow us