Download App

ठाकरे गटाचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा; पण कायद्यानुसार दर्जा मिळू शकतो का? श्रीहरी अणेंनी फोड करून सांगितले

परंतु भास्कर जाधव यांचा दावा हा कायद्याला धरून नाही, असे राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी एक चॅनेलशी संवाद साधताना सांगितले आहे.

  • Written By: Last Updated:

Mahrashtra Assembly Opposition Leader: राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने महाविकास आघाडीला मोठी छोबीपछाड दिली आहे. महायुतीला तब्बल 236 जागा मिळाल्या आहेत. त्यात भाजपला (BJP) तब्बल 132, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला 57, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीला अवघ्या 46 जागा मिळाल्या आहेत. अद्याप राज्याचा नवा मुख्यमंत्री ठरलेला नाहीत. तर विरोधातील एका पक्षाला विरोधी पक्षनेतेपद देण्या इतक्याही जागा नाहीत. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाचा पेच निर्माण झाला आहे. त्यात आता ठाकरे यांच्या शिवसेनेने महाविकास आघाडीत आम्हीच मोठा पक्ष आहे. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळावे, अशी मागणी केली आहे.

एकनाथ शिंदेच ‘मुख्यमंत्री’; श्रीकांत शिंदेंचं आधी ट्विट, नंतर यूटर्न

महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय झालेला नाही. भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे आले आहे. तर सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी शिवसेनेच्या आमदारांची मागणी आहे. परंतु मुख्यमंत्रिपदाबाबतचे निर्णय हे केंद्रातील भाजपनेते घेणार आहेत. त्याबाबत बैठका सुरू आहेत. तर इकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गटाने उचल खाली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष ठाकरे गटाच्या आमदारांची मातोश्रीवर बैठक झाली. त्यात तर विधिमंडळातील दोन्ही सभागृह नेते म्हणून आदित्य ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. तर सुनील प्रभू यांची प्रतोद म्हणून, तर भास्कर जाधव यांची गटनेते म्हणून निवड झाली आहे. गटनेते म्हणून निवड झाल्यानंतर भास्कर जाधव यांनी लगेच विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगितला आहे. महाविकास आघाडीत शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते आम्हाला द्यावे, असे भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी म्हटले आहे.

समोर फडण’वीस’ असले तरी तुम्ही 20 आहात, पुरून उरा..; उद्धव ठाकरेंचा आमदारांना कानमंत्र

परंतु भास्कर जाधव यांचा दावा हा कायद्याला धरून नाही, असे राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी एक चॅनेलशी संवाद साधताना सांगितले आहे. अणे म्हणाले, निवडणुकीपूर्वी आघाडी असली तरीही महाविकास आघाडीचा विरोधी पक्षनेतेपदाशी संबंध नाही. एका पक्षाचा विरोधी पक्षनेता हा पायंडा आहे. त्यामुळे अनेक पक्ष एकत्र येऊन विरोधीपक्षनेतेपद घेऊ शकत नाही. एकत्र येण्याला कायद्यामध्ये स्थान नाही. प्रत्येक पक्ष हे वेगळे आहेत. एकत्र येऊन सहा महिन्याने तू विरोधी नेता हो हे होऊ शकत नाहीत. अशावेळी विरोधी पक्षनेत्याला कायदेशीर सवलती मिळू शकत नाही.

विरोधी पक्षनेत्यासाठी किती जागा हव्यात ?

राज्याचे विधानसभेचे 288 सदस्य आहेत. यातील दहा टक्के संख्याबळ असलेल्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळू शकते. त्यानुसार 29 आमदार असलेल्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळेल. परंतु विरोधातील एकाही पक्षाला इतक्या जागा जिंकता आलेल्या नाही. ठाकरे यांच्या शिवसेनेने सर्वाधिक 20 जागा जिंकलेल्या आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने दहा जागा जिंकलेल्या आहेत. तर काँग्रेसला 16 जागा मिळालेल्या आहेत. त्यामुळे कायद्यानुसार विरोधातील एकाही पक्षाला विरोधीपक्षनेते पद मिळू शकत नाही. तरीही सत्ताधाऱ्यांकडून विरोधी पक्षनेतेपद दिली तर संख्याबळ अभावी, त्याला कायदेशीर दर्जा राहील का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

follow us