Bhaskar Jadhav : राज्यात आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील की नाही? याबाबत शंकाच असल्याचं ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी म्हटलंय. दरम्यान, मतदारयादीच्या घोळावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाची भेट घेत घेतली. या भेटीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सरकारला चांगलंच धारेवर धरलंय.
वसुबारस पूजन : गोधनाची आराधना, समृद्धीची वंदना ! पुण्यात माजी नगरसेवक निम्हण यांचा उपक्रम
पुढे बोलताना आमदार भास्कर जाधव म्हणाले, राज्यात निवडणुका होतील की नाही याबाबत शंकाच आहे. जनतेच्या मनात सरकारच्याबद्दल प्रचंड रोष असंतोष आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वच स्तरातल्या मतदाराला फसवून मतदान घेतलं . सरकारला वाटतं होतं, आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कितीही उशिर केला तरी, हरकत नाही पण कोर्टाने आदेश दिल्याने सरकारची धावपळ झाली आता निवडणुका जड जाणार याचा अंदाज सरकारला आलायं, त्यामुळे निवडणूक होतील की नाही याबाबत शंका असल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलंय.
सुपरस्टार महेश बाबू उद्या प्रदर्शित करणार ‘जटाधारा’ चा धमाकेदार ट्रेलर
निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस, हा भ्रष्टाचारच…
आतापर्यंत लोकांनी मतदान केलं नाही का? आता जो खेळ सुरू आहे. खोटा कारभार सुरू आहे. म्हणूनच म्हटलंय निवडणुका घेऊ नका. हा घोळ दुरुस्त करा. निवडणूक आयोगाचं काम व्यवस्थित निवडणूक पार पाडणं आहे. त्यावेळी आमच्याकडून चूक झाली तर आमच्यावर कायद्याचा बडगा उगारला जातो. करप्ट प्रॅक्टिस म्हणून. मग आम्ही म्हणतो ही निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस आहे. हा त्यांचा भ्रष्टाचार आहे. शिवसेनाप्रमुखांचा मतदानाचा हक्क हिरावला होता. आता निवडणूक आयोगाला काय शिक्षा करायची, असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.
व्यवसायात होणार फायदा अन् …, जाणून घ्या सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल?
दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर निवडणूक आयोगानेही मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे कारण देत राज्यातील मतदार यादीची विशेष सुधारणा पडताळणी मोहीम (SIR) जानेवारी 2026 पर्यंत लागू करण्याची योजना पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली आहे.