वसुबारस पूजन : गोधनाची आराधना, समृद्धीची वंदना ! पुण्यात माजी नगरसेवक निम्हण यांचा उपक्रम
Vasubaras 2025: शहरात गोधनपूजनाची परंपरा जपून समाजात एकात्मता आणि श्रद्धेचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातोय.

Vasubaras 2025 : दिवाळीच्या मंगल प्रारंभाचा पहिला दिवस ‘वसुबारस’(Vasubaras 2025) हा मातृत्व, गोधन आणि समृद्धीच्या पूजनाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या पारंपरिक आणि श्रद्धेच्या दिवशी गोधन पूजनाचा सुंदर उपक्रम माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण (Sunny Vinayak Nimhan) यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
या उपक्रमामध्ये गोधनाचे पूजन करून आपल्या संस्कृतीतील मातृत्व, कृतज्ञता आणि समृद्धीच्या मूल्यांचा सन्मान करण्याचा हेतू आहे. नागरिकांनी आपल्या कुटुंबासह सहभागी होऊन या शुभ क्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सनी निम्हण यांनी केले आहे. या कार्यक्रमाद्वारे शहरात गोधनपूजनाची परंपरा जपून समाजात एकात्मता आणि श्रद्धेचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी सांगितले. उद्या शुक्रवारी सायंकाळी सहा ते रात्री आठ वाजता औंध आणि बोपोडी भागात हा उपक्रम होणार आहे.
सनी निम्हण यांच्याकडून नेहमीच समाजपयोगी उपक्रम राबविले जातात. तसाच हा उपक्रम आहे. त्याव युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम असतात. तरुणांसाठी उपक्रम राबवून, त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्याचे कामही सनी विनायक निम्हण यांच्याकडून सातत्याने केले जात आहे.
( Vasubaras 2025 Initiative of former corporator Sunny Nimhan in Pune)
पूजन स्थळे-परिहार चौक, औंध, चंद्रकांत गायकवाड चौक, मेडिपॉइंट हॉस्पिटल जवळ, औंध, भाले चौक, नागरस रोड, औंध, अमित मुरकुटे संपर्क कार्यालय, बोपोडी, पुणे आयटी पार्क, भाऊ पाटील रोड, बोपोडी.
अधिक माहितीसाठी भेट द्या: www.sunnynimhan.com