Uddhav Thackeray : राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा (Maharashtra Elections) लवकरच होणार आहे. त्याआधी फोडाफोडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे. तसेच नेतेमंडळींकडून सेफ पक्षाचा शोध घेतला जात आहे. तिकीट मिळण्याची शक्यता दिसत नसल्याने दुसऱ्या पक्षांकडे चाचपणी सुरू झाली आहे. यात दिग्गज नेतेही मागे नाहीत. पुणे जिल्ह्यात (Pune News) या संभाव्य पक्षांतराची चर्चा सुरू झाली आहे. महायुतीतील नेते महाविकास आघाडीत त्यातही शरद पवार गटात (Sharad Pawar) जाण्यात जास्त इच्छुक दिसत आहेत. त्यानंतर आता ठाकरे गटाकडेही इच्छुकांचा ओढा वाढू लागला आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपला छत्रपती संभाजीनगरमध्येच मोठा दणका दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात (Amit Shah) असतानाच पक्षाचे सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी दारोदारी फिरताहेत; चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल
अमित शाह काल नागपुरात (Nagpur News) होते. येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांना सांगितले की विदर्भ जिंकला तर महाराष्ट्रही जिंकू, तयारीला लागा अशा सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. परंतु, याचवेळी ठाकरे गटाने संभाजीनगरात भाजपला मोठा धक्का दिला. पक्षाचे सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी यांनी अखेर भाजपाची साथ सोडली. आता ते लवकरच शिवसेनेत दाखल होणार आहे. बहुतेक आजच मुंबईतील मातोश्री येथे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत (Uddhav Thackeray) त्यांचा पक्षात प्रवेश होईल असे सांगितले जात आहे. यासाठी ते आपल्या समर्थकांसह मु्ंबईला रवानाही झाले आहेत. जवळपास दीडशे पेक्षा जास्त गाड्यांचा ताफ आज पहाटेच मुंबईच्या दिशेने निघाला आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं त्यावेळी वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे त्यांच्यासोबत गेले होते. उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्काच होता. आता या मतदारसंघात तुल्यबळ उमेदवाराचा शोध ठाकरे गटाकडून घेतला जात आहे. त्यावेळी डॉ. परदेशी सक्षम उमेदवार ठरू शकतात अशी चर्चा आहे. याच पार्श्वभुमीवर त्यांच्या पक्षप्रवेशाकडं पाहिलं जात आहे. त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना वैजापूर मतदारसंघातून तिकीट मिळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आमची सरकार आणा, जुनी पेन्शन योजना लागू करतो, उद्धव ठाकरेंची कर्मचाऱ्यांना ग्वाही
2009 मधील विधानसभा निवडणुकीत डॉ. दिनेश परदेशी काँग्रेसच्या तिकीटावर वैजापूर मतदारंसघांतून निवडणुकीत उतरले होते. या निवडणुकीत त्यांना 41 हजार 227 मते मिळाली होती. 2014 मध्ये त्यांनी पु्न्हा काँग्रेसच्याच तिकीटावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना 45 हजार 346 मते मिळाली तर शिवसेनेचे उमेदवार आर. एम. वाणी यांना 47 हजार 405 मते मिळाली होती. राष्ट्रवादीचे भाऊसाहेब चिकटगावकर यांना 52 हजार 114 मते मिळाली होती. भाजपाचे एकनाथ जाधव यांना 24 हजार 249 मते मिळाल होती. चौरंगी लढतीत भाऊसाहेब चिकटगावकर यांनी बाजी मारली होती.