पुणेकरांचं गाऱ्हाणं मार्गी लागलं! विमानतळावर मिळणार टपरीवरच्या किमतीत चहा अन् पाणी
पुणे : विमान टर्मिनलवर चहा, कॉफीचे दर हे सामान्य नागरिकांना परवडणारे नसतात. त्यामुळे काही प्रवाशांनी पुणे विमानतळावर (Pune Airport) कमी किमतीत चहा, कॉफी उपलब्ध करण्याची मागणी केली होती. पुणेकरांचे हे गाऱ्हाणं आता मार्गी लागलं असून, आता प्रवाशांना विमानतळावर टपरीवरील किमतीत चहा आणि पाणी विकत घेता येणार आहे. पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलवरती याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. (Pune Airport Tea And Coffee Rate)
Pune : मेट्रोने येरवड्यात उतरा अन् थेट पुणे विमानतळावर जा; या मार्गी होणार फिडर बस सेवेचा लाभ
प्रवाशांचं गाऱ्हाणं काय होतं?
लोहगाव विमानतळाच्या नव्या टर्मिनलमधील खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर प्रवाशांना चहा सुमारे 100 रुपयांना तर पाण्याची बाटली 60 ते 80 रुपयांना विकत घ्यावी लागत होती. हे दर प्रत्येकालाच परवडणारे नव्हते. त्यामुळे मुळे काही प्रवाशांनी कमी किमतीत चहा, कॉफी उपलब्ध करण्याची मागणी केली होती. ती आता मार्गी लागली आहे.
पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनलवर आधीपासूनचं कमी किमतीत चहा, कॉफी आणि शीतपेये देणारे स्टॉल होते, परंतु नवीन टर्मिनलवर असा कोणताही पर्याय आत्तापर्यंत उपलब्ध नव्हता. त्यामुळे प्रवाशांना चहा, कॉफी आणि पाण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागत होते. त्यामुळे काही प्रवाशांनी कमी किमतीत चहा, कॉफी उपलब्ध करण्याची मागणी केली होती. प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद देत, पुणे विमानतळ प्राधिकरणाने आता एक छोटा स्टॉल उघडण्याची योजना जाहीर केली आहे. जिथे चहा आणि बाटलीबंद पाणी फक्त 20 रुपयांमध्ये विकले जाणार आहे.
Devendra Fadanvis : पुणे विचारवंतांचे शहर, इथे निर्णय घेणे अवघड; पुणेकरांना फडणवीसांचे मिश्किल टोले
चहा अन् पाण्यासाठी मोजावे लागणार फक्त 20 रुपये
प्रवाशांच्या या मागणीची दखल घेतल्यानंतर पुणे विमातळाच्या नव्या टर्मिनलवर प्रवाशांना चहा आणि पाण्यासाठी केवळ 20 रुपये मोजावे लागणार आहेत. सरकारने अनुदान देत सामान्य प्रवाशांसाठी ‘उडान’ योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत काही प्रवाशांना कमी किमतीत चहा, कॉफी आणि पाणी उपलब्ध होणार आहे. विमानतळ प्रशासन नवीन टर्मिनलवर एक छोटा स्टॉल सुरू केला जाणार असून, या स्टॉलवर प्रवाशांना पाणी, चहा आणि कॉफीसाठी अवघे 20 रुपये खर्च करावे लागणार आहेत.
Ajit Pawar : पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर, अजित पवारांकडून तयारीचा आढावा
पुणे विमानतलाचे नामकरण
पुणे (लोहगाव) आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे’ असे करण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी (दि.23) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. आता राज्य सरकारकडून त्याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात येणार आहे. या आनंदाच्या बातमीनंतर आता पुणेकरांना नव्या टर्मिनलवर स्वतःत पाणी आणि चहा, कॉफीचा आनंद घेता येणार आहे.