Pune : मेट्रोने येरवड्यात उतरा अन् थेट पुणे विमानतळावर जा; या मार्गी होणार फिडर बस सेवेचा लाभ
Feeder Bus Service In Pune : पुणे मेट्रो व पीएमपीएमएलच्या संयुक्त विद्यमाने येरवडा मेट्रो स्थानक ते लोहगाव विमानतळ (आयटी पार्क, रामवाडी मेट्रो स्थानक, विमाननगर मार्गे) या मार्गावरुन (Pune) मेट्रो इंटीग्रेटेड फिडर बस सेवा दिनांक १२/९/२०२४ पासून सुरु करण्यात आली आहे. आता मेट्रो प्रवासी लोहगाव विमानतळ येथे ये-जा करण्यासाठी येरवडा आणि रामवाडी मेट्रो स्थानक या दोन्ही ठिकाणाहून या फिडर बस सेवेचा लाभ घेऊ शकतील.
भोर विधानसभा मतदारसंघावर भाजपने केला दावा; तालुका अध्यक्षाने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
अडचणी दूर
रामवाडी मेट्रो स्थानक, वडगाव शेरी फाटा, विमाननगर काॅर्नर, पाचवा मैल, टाटा गार्डन, चंदननगर, खराडी बायपास, जनकबाब दर्गा, टाउन डाउन चौक, राघोजी चव्हाण चौक, वर्ल्ड ट्रेड सेंटर क्रमांक तीन आणि पाच, ईऑन गेट नंबर-२, इम्पेरिअल अल्फा काॅम्प्लेक्स, इंटरनॅशनल टेक पार्क असा या विस्तार आहे. दरम्यान, ऑगस्टमध्ये या सेवेचा शुभारंभ पीएमपीच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे यांच्या उपस्थितीत झाला. या सेवेमुळे मेट्रोच्या प्रवाशांना पीएमपीच्या माध्यमातून मेट्रो स्थानकापर्यंत वेळेत पोहोचता येणे शक्य होणार आहे.
पुणे मेट्रो व पीएमपीएमएलच्या संयुक्त विद्यमाने येरवडा मेट्रो स्थानक ते लोहगाव विमानतळ (आयटी पार्क, रामवाडी मेट्रो स्थानक, विमाननगर मार्गे) या मार्गावरुन मेट्रो इंटीग्रेटेड फिडर बस सेवा दिनांक १२/९/२०२४ पासून सुरु करण्यात आली आहे.
आता मेट्रो प्रवासी लोहगाव विमानतळ येथे ये- जा… pic.twitter.com/MRSCEHR0xw
— Pune Metro Rail (@metrorailpune) September 12, 2024