Download App

एकनाथ शिंदेच ‘मुख्यमंत्री’; श्रीकांत शिंदेंचं आधी ट्विट, नंतर यूटर्न

निवडणूक निकालानंतर आता सीएमपदासाठीची महायुतीतील नेत्यांमध्येच चुरूस निर्माण झाली. श्रीकांत शिंदेंनी सीएमपदी एकनाथ शिंदेचं असावे, असं म्हटलं.

  • Written By: Last Updated:

Shrikant Shinde : विधानसभा निवडणुकीती (Assembly elections) दणदणीत विजयानंतर आता सत्ता स्थापनेच्या घडामोडी सुरु आहेत. भाजप (BJP) मुख्यमंत्रिपद मित्रपक्षांना सोडण्यास तयार नाही. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्रिपदावर कायम राहण्यास उत्सुक आहेत.अशातच खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी एकनाथ शिंद मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत, ही सर्वसामान्यांची भावना असल्याचं म्हटलं.

एकनाथ शिंदेच ‘मुख्यमंत्री’; श्रीकांत शिंदेंचं आधी ट्विट, नंतर यूटर्न 

विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघालं. आता सीएमपदासाठीची महायुतीतील नेत्यांमध्येच चुरूस निर्माण झाली. आता श्रीकांत शिंदेंनी सीएमपदी एकनाथ शिंदेचं असावे, असं म्हटलं. NewsSpectrumAnalyzer ने श्रीकांत शिंदे यांच्या ट्वीटचा फोटो शेअर केला. श्रीकांत शिंदेंच्या पोस्टमध्ये लिहिलं की, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्रीपदी पुन्हा. मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब विराजमान व्हावेत अशी सर्वसामान्य जनतेची ही भावना आहे. दरम्यान, काहीच वेळानंतर ही पोस्ट डिलीट करण्यात आली.

विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. भारतीय जनता पक्ष हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 288 पैकी 237 जागा जिंकल्या आहेत. एकट्या भाजपला 136 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळं राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होणार हे आता निश्चित झालं आहे. भाजपच्या सर्वाधिक जागा असल्याने फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जात आहेत.

यशवंतराव चव्हाणांचा सुसंस्कृत राजकारणाचा वारसा जपतच पुढची वाटचाल असणार; डॉ. अतुलबाबा भोसलेंची ग्वाही… 

मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असून त्यांचे आमदारही एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा सातत्याने करत आहेत. अशातच राजधानी दिल्लीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. राज्याचे मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहणार असल्याचा निर्णय दिल्लीत झाल्याने एकनाथ शिंदे नाराज झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंना हा संदेश दिल्लीतून कळवण्यात आला.

दरम्यान, मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहणार असल्याने आता एकनाथ शिंदे वेगळा काही निर्णय घेणार? हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us