Manipur महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून कलाकारांनी व्यक्त केला संताप, ट्वीट करत म्हणाले…

Manipur Violence Incident: मणिपूरमधील (Manipur) त्या घटनेने संपूर्ण देशात  खळबळ माजली आहे. २ महिलांची भररस्त्यामध्ये विवस्त्र धिंड काढण्यात आल्याने देशात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Video Viral) चांगलाच धुमाकूळ घालत आहे. तर या घटनेवर काही बॉलिवूड कलाकारांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून मणिपूरमध्ये या घटनेचा जोरदार निषेध नोंदवत असल्याचे दिसून येत […]

Manipur Violence Incident

Manipur Violence Incident

Manipur Violence Incident: मणिपूरमधील (Manipur) त्या घटनेने संपूर्ण देशात  खळबळ माजली आहे. २ महिलांची भररस्त्यामध्ये विवस्त्र धिंड काढण्यात आल्याने देशात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Video Viral) चांगलाच धुमाकूळ घालत आहे. तर या घटनेवर काही बॉलिवूड कलाकारांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून मणिपूरमध्ये या घटनेचा जोरदार निषेध नोंदवत असल्याचे दिसून येत आहे.

खिलाडीने म्हणजेच अक्षय कुमारने (Akshay Kumar) ट्वीटमध्ये सांगितले आहे की, ‘मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराचा तो व्हिडीओ बघीन मी हादरून गेलो आहे. मला आशा आहे की, दोषींना एवढी कठोर शिक्षा मिळावी कीपरत एकदा असा भयानक प्रकार करण्याच्या अगोदर १० वेळेस विचार केला पाहिजे.

तसेच अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) आणि रिचा चड्ढा (Richa Chadha) यांनी देखील ट्वीट केलं आहे. यामध्ये रिचा चड्ढानं ट्वीटमध्ये, ‘लज्जास्पद! भयानक! नियमहीन!’ असे खोचक प्रकारचे लिखाण केले आहे.

तर रेणूका शहाणे (Renuka Shahane) हिने देखील ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘मणिपूरमधील अत्याचार रोखणारे कोणी नाही का? दोन महिलांच्या त्या धक्कादायक व्हिडीओने जर तुमचा थरकाप उडाला नसेल, तर स्वत:ला माणूस म्हणणे योग्य आहे का? असा संतप्त सवाल तिने यावेळी केला आहे.

Exit mobile version