Download App

ICC Womens Cricket World Cup साठी वुमन्स टीम जाहीर, हरमनप्रीतच्या आर्मीमध्ये कोण कोण?

Women Cricket World Cup 2025  : पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या महिला क्रिकेट विश्वचषकासाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 

  • Written By: Last Updated:

Women Cricket World Cup 2025  : पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या महिला क्रिकेट विश्वचषकासाठी (Women Cricket World Cup 2025) आज भारतीय संघाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. 30 सप्टेंबरपासून भारत आणि श्रीलंकेत 8 संघांचा महिला एकदिवसीय विश्वचषक सुरू होत आहे. नीतू डेव्हिड यांच्या अध्यक्षतेखालील महिला निवड समितीने या स्पर्धेसाठी 15 स्टार खेळाडूंची निवड केली आहे. निवडीनंतर नीतू डेव्हिड यांनी पत्रकार परिषदेत संघाची घोषणा केली. या स्पर्धेत हरमनप्रीत कौर भारतीय संघाचे नेतृत्व करेल.

शेफाली वर्माला संधी नाही

आयसीसी महिला विश्वचषक 2025 साठी स्मृती मानधना हिची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. तर प्रतीका रावल, हरलीन देओल, दीप्ती शर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्ज सारख्या स्टार खेळाडू देखील या संघाचा भाग आहेत. मात्र शेफाली वर्माची संघात निवड झालेली नाही.

भारतीय संघाचे सामने

आयसीसी महिला विश्वचषकात भारतीय संघ पहिला सामना 30 सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. तर 5 ऑक्टोबर रोजी दुसरा सामना पाकिस्तानशी होणार आहे. तिसरा सामना 9 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिका, 12 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया, 19 ऑक्टोबर रोजी इंग्लंड, 23 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड आणि 26 ऑक्टोबर रोजी बांगलादेशशी होणार आहे. भारतातील स्पर्धेचे सामने बेंगळुरू, इंदूर, गुवाहाटी आणि विशाखापट्टणम येथे खेळले जातील.

मंत्रिमंडळ बैठकीत 4 मोठे निर्णय; मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना होणार फायदा 

एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी, रिचा घोष (यष्टिरक्षक), क्रांती गौड, अमनजोत कौर, राधा यादव, श्री चरणी, यास्तिका भाटिया (यष्टिरक्षक) आणि स्नेह राणा.

follow us