टीम इंडियाच्या स्वागतासाठी क्रिकेटप्रेमींची गर्दी, ॲम्ब्युलन्स येताच रस्ता केला मोकळा, पाहा व्हिडिओ

टीम इंडियाच्या स्वागतासाठी क्रिकेटप्रेमींची गर्दी, ॲम्ब्युलन्स येताच रस्ता केला मोकळा, पाहा व्हिडिओ

Team India Mumbai Road Show: टी – 20 क्रिकेट (T-20)स्पर्धेत विश्वविजेत्या ठरलेला भारतीय संघाचे (Indian team) मुंबईत मोठ्या जल्लोषात स्वागत केलं जातं आहे. टीम इंडियाच्या रोड शोसाठी मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात क्रिकेट चाहत्यांची मोठी गर्दी केली. त्यामुळे काहीशी वाहतूक कोंडीही झाल्याचं चित्र आहे. पण, एवढ्या गर्दीत एक ॲम्ब्युलन्स पाहून क्रिकेटप्रेमींनी काही सेंकदात ॲम्ब्युलन्सला वाट मोकळी करून दिली.

कार खरेदीची तयारी? होणार 55 हजारांची बचत, टाटा देतोय ‘या’ कार्सवर बंपर डिस्काउंट 

29 जून रोजी झालेल्या विजेतेपदाच्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक जिंकला. या विजयानंतर भारतीय संघ आज भारतात परतला असून मरीन ड्राइव्ह ते वानखेडे स्टेडियम असा रोड शो टीम इंडिया करणार आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियम ते मरीन ड्राईव्हपर्यंत मोठी गर्दी जमली आहे.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील मिळकती होणार ‘फ्री होल्ड’; मंत्री सामंतांचे आश्वासन 

मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात क्रिकेट चाहत्यांनी मोठी गर्दी केल्यामुळं संपूर्ण रस्ता बंद झाला, अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. मात्र, एवढ्या मोठ्या गर्दीतून एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं आहे. मरीन ड्राईव्हवर जमलेल्या क्रिकेट चाहत्यांनी प्रचंड गर्दीतून एका ॲम्ब्युलन्सला जाण्यासाठी रस्ता मोकळा करून दिला. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतीय संघाच्या स्वागतासाठी मुंबईच्या मरीन ड्राइव्हवर एवढ्या मोठ्या गर्दीमधून अॅम्ब्युलन्सला जाण्याासाठी काही सेकंदात रस्ता मोकळा करून दिल्यामुळं अनेकांकडून कौतुकही करण्यात येत आहे.

दरम्यान, विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी मुंबईत जमलेली गर्दी पाहून भारतीयांचं क्रिकेटवर किती प्रेम आहे, याचा प्रत्यय येतो.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज