Swara Bhaskar U turn after Offensive statement about Chhaava Film : अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. तेच ती तिच्या बेधडक विधानांसाठी देखील ओळखली जाते. यावेळी देखील तिने असंच एक वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावर आता तिने स्पष्टीकरण दिले आहे.
काय म्हणाली स्वरा भास्कर?
माझ्या प्रयागराजची चेंगराचेंगरी आणि छावा चित्रपटाबाबतच्या पोस्टने वाद आणि गैरसमज निर्माण केला आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान वारशाचा विशेषत: त्यांच्या महिलांबाबतच्या धोरणांचा आदर करते यात कोणतीही शंका नाही. मला असं म्हणायचं होत की, इतिहासाचा गौरव करणे चांगली गोष्ट आहे. पण वर्तमानातील चुका लपवण्यासाठी त्याचा गैरवापर केला जाऊ नये.
इतिहासाचा वापर हा लोकांना एकत्र आणण्यासाठी केला जावा. लोकांचे सध्याच्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी नाही. तसेच माझ्या अत्ताच्या पोस्टने लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा मागते. इतरांप्रमाणे मला देखील आपल्या इतिहासाचा अभिमान आहे. तो आपल्याला एकत्र आणतो आणि उज्ज्वल भवितव्या घडवण्यासाठी ताकद देतो. असं म्हणत स्वराने स्पष्टीकरण दिलं आहे.
My tweet has generated much debate & avoidable misunderstanding. Without any doubt I respect the brave legacy and contribution of Chhatrapati Shivaji Maharaj.. especially his ideas of social justice & respect for women.
My limited point is that glorifying our history is great… https://t.co/YKk1QgiQRG— Swara Bhasker (@ReallySwara) February 21, 2025
काय म्हणाली होती स्वरा?
स्वराने एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली होती. त्यात तिने लिहिलंय की, चेंगराचेंगरी होऊन लोकांचे भयावह मृत्यू झालेत. पण, ते सोडून जो समाज काल्पनिक चित्रपटातील ५०० वर्षांपूर्वीचा सीन पाहून भावूक होत असेल किंवा संताप व्यक्त करत असेल तर तो समाज मनाने आणि आत्म्याने मेलाय… चुकीच्या व्यवस्थापनामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत लोकांचे मृत्यू झाले. त्यांचे मृतदेह बुलडोद्वारे काढावे लागले. यावर चिंता न करता समाज ५०० वर्षांपूर्वीचेा सीन पाहून होत आहे, संताप व्यक्त करत आहे, असं स्वरा भास्करने म्हटलं होतं.
पुण्यात गुंडाराज, गजा मारणेच्या टोळीनं पुन्हा तरूणाला बेदम मारलं; पोलीस अधिकारी काय म्हणतात?
दरम्यान, स्वराचे हे ट्विट समोर येताच सोशल मीडियावर तिच्यावर जोरदार टीका झाली. एका युजरने तिच्या पोस्टला उत्तर देताना लिहिलं की, या चित्रपटात ताजमहाल आणि मुघल-ए-आझम सारख्या काल्पनिक प्रेमकथांपेक्षा धर्मांध मुघलांचा खरा इतिहास दाखवण्यात आला आहे. त्यामुळं धर्मांतरित महिला नाराज आहे. तुम्ही औरंगजेबाने संभाजीराजेंना छळले नाही, हे सिध्द करा. तर दुसऱ्या एका युजरने लिहिलंय की, छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिष्ठेला काल्पनिक आणि औरंगजेबाच्या अत्याचारांना खोटे ठरवून तिने मराठ्यांचा सन्मान नाकारला, असं लिहिलं.