I said it jokingly, I take back my words; Ajit Pawar’s U-turn on Wish of Make Chief Minister : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची मुख्यमंत्रिपादाची इच्छा लपून राहिलेली नाही. काल पुन्हा एकदा त्यांनी मुख्यमंत्री (Chief Minister) होण्याची इच्छा व्यक्त केली. कित्येक वर्षे मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतंय, पण तो योग कुठेही जुळून आलेला नाही, एक दिवस तो योग येईल, अशा शब्दात अजितदादांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावर आता अजित पवारांनी आपलं विधान मागे घेत युटर्न घेतला आहे.
काय म्हणाले अजित पवार?
मुख्यमंत्री होण्याबाबत मी गंमतीने विधान केलं, मात्र जर तसं विधान केलं असेल तर ते विधान मी मागे घेतो. मी मुख्यमंत्री व्हावं अशी कार्यकर्त्यांची किंवा माझी जरी इच्छा असेल तर त्याला 145 आमदारांचा पाठिंबा लागतो. तरच ती इच्छा सफल होईल. जोपर्यंत तो पाठिंबात कोणाला मिळत नाही. तोपर्यंत मुख्यमंत्री होता येत नाही. ज्याप्रमाणे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 145 हून अधिक आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. त्या अगोदर एकनाथ शिंदे. उद्धव ठाकरे यांना हा पाठिंबा मिळालेला आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्री झाले. असं म्हणत अजित पवार यांनी आपल्या विधानावरून युटर्न घेतला आहे.
धक्कादायक! पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF जवान नोकरीतून बडतर्फ
अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?
महाराष्ट्र महोत्सव-२०२५ मध्ये ken (दि. 2 मे) महाराष्ट्रातील कर्तबगार महिलांचा गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले होते, आज महिलांचा गौरव करत आहोत हे सांगतानाच महिलांनी आज प्रत्येक क्षेत्रात यश मिळविले आहे. आम्ही पण अनेक महिलांना संधी देण्याचे काम करत आहोत. लाडक्या बहिणीसाठी चांगला निर्णय सरकारने घेतला आहे. त्यांच्या कुटुंबांना आधार देण्याचे काम केले आहे. राज्यात महिला मुख्यमंत्री व्हावे हे सर्वांना वाटते, पण ते अद्याप शक्य झालेले नाही… कित्येक वर्षे मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटत आहे पण तो योग कुठेही जुळून आलेला नाही, एक दिवस तो योग येईल, असं ते म्हणाले.