धक्कादायक! पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF जवान नोकरीतून बडतर्फ

Munir Ahmed Dismissed : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव प्रचंड (India Pakistan Tension) वाढला आहे. भारत सरकारने देशात राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांचे सर्व प्रकारचे व्हिसा रद्द केले आहेत. यानंतर पाकिस्तानी नागरिक त्यांच्या देशात परतले आहेत. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. सीआरपीएफ जवानाने एका पाकिस्तानी महिलेशी लग्न केलं होतं. परंतु, ही माहिती त्याने लपवून ठेवली होती. सत्य समोर आल्यानंतर या जवानाला बडतर्फ करण्यात आले आहे.
मुनीर अहमद असे या जवानाचे नाव आहे. मुनीरचे हे कृत्य राष्ट्रीय सुरक्षेसाठी निश्चितच धोकादायक आहे असे मत एका अधिकाऱ्याने व्यक्त केले. याच वर्षात मार्च महिन्यात मुनीरने मिनल खान नावाच्या एका पाकिस्तानी महिलेशी विवाह केला होता. अडीच महिन्यांपूर्वी पाकिस्तानची नागरिक असलेल्या मीनल खान हिच्याशी मुनीरने लग्न केले होते. यानंतर ती व्हिजिटिंग व्हिसा घेऊन भारतात आली होती. नंतर तिने दीर्घकालीन व्हिसासाठी अर्ज केला होता. तिच्या व्हिसाची मुदत 22 मार्च 2025 मध्येच संपली होती. तरीही ती भारतातच राहत होती.
पाकिस्तानला हादरवणारी बातमी! ‘या’ शहरातील इमारतींवर बलूच बंडखोरांचा कब्जा; काय घडलं?
पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत सरकारने पाकिस्तानींचे सर्व व्हिसा रद्द करून त्यांना त्यांच्या देशात परतण्याचे आदेश दिले होते. यानंतर मीनल खान या पाकिस्तानी महिलेची दीर्घकालीन व्हिसासाठी मुलाखत घेण्यात आली होती. तसेच जम्मू काश्मीर उच्च न्यायालयात तिच्या याचिकेवर सुनावणी झाली. यानंतर तिला आणखी काही दिवस भारतात राहण्याची परवानगी देण्यात आली. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 14 मे रोजी होणार आहे.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विवाह झाल्यानंतर मुनीरने त्याची पत्नी मीनल खानला टूरिस्ट व्हिजावर भारतात बोलावले होते. तिच्य व्हिसाची मुदत 22 मार्च रोजीच संपली होती. तरीही बेकायदेशीर पद्धतीने ती भारतातच राहत होती. जम्मूतील हंदवाल येथील रहिवासी मुनीर 2017 मध्ये सीआरपीएफमध्ये भरती झाला होता. परंतु, त्याने आता थेट देशाच्या सुरक्षिततेलाच धोका उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे मत सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
India VS Pak: थेट युद्ध न करता भारत पाकला ‘या’ मार्गाने धडा शिकवेल
पाकिस्तानी नागरिकाबरोबर केलेला विवाह लपवणे, त्याच्या व्हिसाची मुदत संपली असतानाही त्याला शरण देणे या कारणांमुळे मुनीर अहमदला तत्काळ बडतर्फ करण्यात येत असल्याचे सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.