India VS Pak: थेट युद्ध न करता भारत पाकला ‘या’ मार्गाने धडा शिकवेल

India VS Pak: थेट युद्ध न करता भारत पाकला ‘या’ मार्गाने धडा शिकवेल

India VS Pak: पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने (India) पाकिस्तानविरुद्ध (Pak)कारवाई सुरू केली आहे. त्यात सिंधू पाणी वाटप करार रद्द करणे, पाकचा व्हिसा रद्द करणे, पाकिस्तानच्या आयातीवर बंदी घालणे हे निर्बंध लादले आहेत. पहलगाम हल्ल्यामागे ( Pahalgam attack) पाकिस्तान असल्याने थेट पाकविरुद्ध लष्करी कारवाई केली पाहिजे, अशी देशातील लोकांची संतप्त भावना आहे. परंतु थेट युद्ध न करता भारत पाकिस्तानला अनेक मार्गाने धडका शिकवू शकते, असे मत आंतरराष्ट्रीय अभ्यासक मांडत आहे. हे मार्ग कोणते ते पाहुया…


मुलीने अचानक थांबवली स्कूटर अन् उचलला रस्त्यावर असणारा पाकिस्तानी ध्वज, शाळेतून निलंबित

दहशतवाद्यांविरोधात कारवाई
लष्कर ए तौयब्बाचा प्रमुख हाफिज सईद आणि दहशतवादी मसूद अझहर हे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले करतात. जसे अमेरिकेने ओसामा बिन लादेनला शोधून त्याचा शेवट केला होता. त्या पद्धतीने भारताने हाफिज सईद आणि मसूद अझहरचा खातमा करणे आवश्यक आहे. त्यासाठी सॅटेलाइटसाठी अत्याधुनिक साधने भारताने वापरली पाहिजे. हे दोन दहशतवादी अनेकदा पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोटमध्येही बचावले आहेत. या दोघांना शोधण्यासाठी भारताने दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त केले पाहिजे.

INDIA vs Pakistan : पाकिस्ताने केली अब्दाली क्षेपणास्त्राची चाचणी, मारा क्षमता 450 किमी


जिहादी जनरलचे मनसुबे

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या काश्मीरबद्दलच्या विधानानंतर पहलगाम हल्ला झाला आहे. त्यामुळे मुनीर हेही या हल्ल्याला जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. मुनीरविरोधात भारत थेट कारवाई करू शकत नाही. परंतु येथील लष्करप्रमुख हे देश चालवतात. मुनीर यांनी पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांचे नेतृत्व केलेले आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएएसआयचे ते प्रमुख होते. परंतु तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांना हटविले होते. जनरल मुनीर हे 2022 मध्ये पाकिस्तानचे लष्करप्रमुख झाले होते. परंतु त्यांचे आणि इम्रान खानमध्ये वाद झाला. त्यामुळे इम्रान खा हे आता भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात आहे. लष्कराप्रमुखाविरोधात भारत थेट कारवाई करणार नाही. परंतु तेथील परिस्थिती चिघळली तर लष्करप्रमुखाला पद सोडावे लागू शकते.


पाकिस्तानचे तुकडे करणे

पाकची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. तसेच या देशात गृहयुद्ध सुरू आहे. बलोचिस्तानचे नागरिक हे स्वतंत्र्य राष्ट्रासाठी झगडत आहे. बलोचिस्तामध्ये रेल्वे हायजॅक करण्यात आली होती. येथे पाककडून लष्करी कारवाई करण्यात येत आहे. या भागात लष्कर तैनात आहे. बलोचिस्तान, सिंध प्रांत, खैबर पख्तुनवा आणि गिलगिट बाल्टिस्तानमधे गृहयुद्ध पेटलंय. उरलासुरला पंजाब प्रांत आपल्या देशातल्या एखाद्या राज्याएवढाही उरणार नाही. या परिस्थितीत भारताने फायदा उठवून पाकिस्तानचे तुकडे केल्यास पाक भारताच्या नादी लागणार नाही.


यूएनमध्ये आवाज उठवणे

बलोचिस्तानमध्ये महिला, बालकांवर पाकिस्तान लष्कारकडून अत्याचार केले जात आहे. यासाठी बातम्या आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये येत असतात. त्यामुळे याचा फायदा घेऊन भारताने हा विषय यूएनमध्ये उठविला पाहिजे. त्याचबरोबर पाकिस्तानला अमेरिका, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) निधी मिळवू न देणे असे उपाय केल्यास पाकिस्तानला भारत जेरीस आणू शकतो. आर्थिक परिस्थिती न राहिल्यास पाकिस्तानची जनता लष्करप्रमुख, सरकारविरोधात जाईल. त्यातून पाकिस्तान अस्थिर होऊन तो भारताविरुद्ध डोळे वाटारून पाहू शकत नाही, असे मत आंतरराष्ट्रीय अभ्यासक मांडत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube