Pahalgam attack: गुजरात पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; हजारहून अधिक बांगलादेशी ताब्यात

Pahalgam attack: गुजरात पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक;  हजारहून अधिक बांगलादेशी ताब्यात

Gujarat Police’s historic performance after Pahalgam attack More than a thousand Bangladeshi nationals detained : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप भारतीयांचा (Pahalgam Terror Attack) अतिरेक्यांनी बळी घेतला. पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला. हिंदू असल्याची खात्री करून घेत त्यांना गोळ्या घातल्या. मानवतेला काळिमा फासणारं कृत्य अतिरेक्यांनी केलं. त्यानंतर आता देशभर पाकिस्तानी आणि अवैध नागरिकांवर कारवाईची गती वाढली आहे. यामध्ये गुजरातमध्ये तब्बल एक हजार 24 बांगलादेशी नागरिक आढळून आले आहेत. हा आकडा ऐतिहासिक असल्याचं सांगितंल जात आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभर पाकिस्तानी आणि अवैध नागरिकांवर कारवाईची गती वाढली आहे. यात गुजरात पोलिसांनी शनिवारी पहाटे केलेल्या कारवाईमध्ये एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. त्यामध्ये गुजरातमध्ये तब्बल एक हजार 24 बांगलादेशी नागरिक आढळून आले आहेत. जे अवैधरित्या भारतात राहत आहेत. हा आकडा ऐतिहासिक असल्याचं सांगितंल जात आहे. तसेच ते राज्याच्या मुख्य शहरांमध्ये अहमदाबाद आणि सुरतमध्ये आढळले आहेत. यातील 890 जण अहमदाबाद आणि सुरतमध्ये 134 जण आढळले आहेत.

Iran Port Blast : मोठी बातमी! इराणच्या बंदरात स्फोट, 500 हून अधिक लोक जखमी

यावर गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी बोलताना सांगितले की, हा गुजरातच पोलिसांचा ऐतिहासिक विजय आहे. तसेच सैन्याने त्यांच्यावर करडी नजर ठेवलेली आहे. तर पोलिस अधिकाऱ्यांनी देखील तेच सांगितले की, ते देखील म्हणाले की, हा बेकायदेशीर नागरिक आणि स्थलांतरितांवरील ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राईक आहे. दरम्यान पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभर पाकिस्तानी आणि अवैध नागरिकांवर कारवाईची गती वाढली आहे.मात्र हे नागरिक पाकिस्तानी नसून बांगलादेशी आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दल ॲक्शन मोडमध्ये; अनंतनागमध्ये 175 संशयित ताब्यात

follow us
  • fb
  • instagram
  • youtube