मुलीने अचानक थांबवली स्कूटर अन् उचलला रस्त्यावर असणारा पाकिस्तानी ध्वज, शाळेतून निलंबित

Saharanpur Video Viral : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम हल्ल्यानंतर ( Pahalgam Attack) संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानवर (Pakistan) कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. तर भारतातील अनेक ठिकाणी लोक पाकिस्तानी ध्वज (Pakistani Flag) रस्त्यांवर चिटकवून ध्वजाला पायाने चिरडून संताप व्यक्त करत आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधून (Saharanpur Video Viral) एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये एक मुलगी रस्त्यावर चिटकवलेला पाकिस्तानी ध्वज उचलण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये 11 वी मध्ये शिकणारी मुलगी रस्त्यावर चिटकवलेला पाकिस्तानी ध्वज उचलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये मुलगी शाळेच्या गणवेशात दिसत असून ती स्कूटरवरुन उतरली आणि रस्त्यावर असणारा पाकिस्तानी ध्वज उचलण्याचा प्रयत्न करते. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थिनीवर शाळेकडून देखील कारवाई करण्यात आली आहे. शाळेने पाकिस्तानी ध्वज उचलणाऱ्या विद्यार्थिनीला शाळेतून काढून टाकले आहे. याबाबत माहिती देताना शाळेचे मुख्याध्यापक भूपेंद्र सिंह म्हणाले की, व्हायरल व्हिडिओची माहिती मिळताच शाळेने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे की चौकशीनंतर कारवाई केली जाईल. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थिनी खूप घाबरली आहे आणि ती घराबाहेरही पडत नसल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या प्रकरणात तिचे कुटुंबही काही बोलण्यास तयार नाही.
🚨 11th Grade Muslim girl in Saharanpur tried removing a Pakistan flag pasted on the road.
~ She has been EXPELLED from school for it.A video had gone viral on Social Media. She stopped her scooty, parker it on the side, & went to remove the Pakistani Flag. pic.twitter.com/gEqREr3Ls9
— The Analyzer (News Updates🗞️) (@Indian_Analyzer) May 1, 2025
प्रकरण काय आहे?
माहितीनुसार व्हायरल झालेला व्हिडिओ उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील गंगोह शहराचा आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणात हिंदू संघटना रस्त्यावर उतरले असून कारवाई करण्याची मागणी करत आहे. व्हिडिओमध्ये एक मुलगी स्कूटरवरुन जात असताना अचानक थांबते आणि रस्त्यावर चिटकवण्यात आलेला पाकिस्तानी ध्वज काढण्याचा प्रयत्न करते. सध्या या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
भारताने पाकिस्तानला दिला आणखी एक मोठा धक्का, सर्व प्रकारच्या पोस्टल- पार्सल सेवा बंद
तर दुसरीकडे पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये महाराष्ट्र, ओरिसा, कर्नाटका येथील पर्यटकांचा समावेश होता. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.