भारताने पाकिस्तानला दिला आणखी एक मोठा धक्का, सर्व प्रकारच्या पोस्टल- पार्सल सेवा बंद

India Bans Postal Services : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारकडून (Government of India) पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. भारताने या हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत (Pakistan) असणारा सिंधू जल करार (Indus Water Treaty) देखील रद्द केला आहे. याच बरोबर देशात पाकिस्तानी नागरिकांची एन्ट्री बंद केली आहे. तर पाकिस्तानवर सैन्य कारवाई करण्याची देखील तयारी भारताकडून करण्यात येत आहे. आता पाकिस्तानवर भारताकडून आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे.
भारताने आता पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व पोस्टल आणि पार्सल सेवांची (India Bans Postal Services) देवाणघेवाण बंद केली असल्याची घोषणा केली आहे. भारताचा हा निर्णय हवाई आणि जमीन या दोन्ही मार्गांसाठी लागू करण्यात आला आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली.
India suspends exchange of all categories of mail, parcels from Pakistan through air and surface routes. pic.twitter.com/21rogxhD3k
— Press Trust of India (@PTI_News) May 3, 2025
ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानकडून टपाल सेवा बंद करण्यात आली होती मात्र त्यानंतर पाकिस्तान ही सेवा तीन महिन्यानंतर पुन्हा सुरु केली होती. मात्र पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने सर्व प्रकारचे पोस्टल आणि पार्सल सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये महाराष्ट्र, ओरिसा, कर्नाटका येथील पर्यटकांचा समावेश होता. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वादानंतर उल्लू अॅपने ‘हाऊस अरेस्ट’ शो काढला; एजाज खानसह अनेक जण कायद्याच्या कचट्यात अडकले !
या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याची माहिती भारत सरकारला मिळाली असल्याने पाकिस्तानवर भारताने कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे आणि लवकरच भारत पाकिस्तानवर सैन्य कारवाई करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.