Video : मोदीजी मला एक आत्मघातकी बॉम्ब द्या, मी पाकिस्तानात जाऊन..काँग्रेस मंत्र्यांच मोठं विधान

Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात दहशतवाद्यांबद्दल संताप आहे. सर्वजण सरकारकडे कठोर कारवाई करावी अशी मागणी करत आहेत. (Attack ) त्याच आशयाचं कर्नाटकच्या एका मंत्र्याचं विधान खूप चर्चेत आहे.
पंतप्रधानांकडे केली ही मागणी
कर्नाटकचे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री बीझेड जमीर खान यांचे एक विधान सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते स्वतः पाकिस्तानला जाण्याबद्दल बोलले आहेत. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी परवानगी दिली तर मी स्वतः बॉम्ब घेऊन शेजारील देशाशी लढायला जाईल, असं ते म्हणालेत. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
पहलगामनंतरही पाकिस्तानच्या कुरापती; सीमावर्ती भागांमध्ये गोळीबार, भारतीय जवानांचं थेट उत्तर
पाकिस्तान नेहमीच भारताचा शत्रू राहिला आहे. जर पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी परवानगी दिली तर मी युद्धात जाण्यास तयार आहे. अमित शहा यांनी माझ्याकडं बॉम्ब देण्याचे आवाहनही त्यांनी केलं आहे. “मी युद्धासाठी पाकिस्तानात जाईन, पंतप्रधान मोदी आणि अमित शहा मला एक बॉम्ब देतील, मी तो माझ्या शरीरावर बांधून पाकिस्तानात जाऊन त्यांच्यावर हल्ला करेन असंही ते म्हणाले आहेत.
निष्पाप नागरिकांचे प्राण गेले
जमीर अहमद खान यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि ही घटना निष्पाप नागरिकांविरुद्ध एक घृणास्पद आणि अमानवी कृत्य असल्याचे वर्णन केलं. त्यांनी म्हटलं होतं की प्रत्येक भारतीयाने एकजूट दाखवली पाहिजे आणि केंद्राला राष्ट्रीय सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्याचे आवाहनही केले पाहिजे असंही ते म्हणाले.
🚨 Karnataka Minister Zameer Ahmed says, “Let Modi-Shah give me a suicide bomb, I will tie it to my body, go to Pakistan & attack them.” pic.twitter.com/H5OEvEngop
— Right Arm Leftist (@rightarmleftist) May 3, 2025