पहलगामनंतरही पाकिस्तानच्या कुरापती; सीमावर्ती भागांमध्ये गोळीबार, भारतीय जवानांचं थेट उत्तर

पहलगामनंतरही पाकिस्तानच्या कुरापती; सीमावर्ती भागांमध्ये गोळीबार, भारतीय जवानांचं थेट उत्तर

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही पाकिस्तानच्या सीमेवरील भारतविरोधी कुरापती सुरूच आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) आणि आंतरराष्ट्रीय सीमेला (Attack) लागून असलेल्या पाच जिल्ह्यांतील गावांत पाकिस्तानी रेंजर्सकडूनकडून करण्यात आलेल्या गोळीबारास आज भारतीय जवानांनी देखील सडेतोड प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानकडून आज सलग आठव्या दिवशी गोळीबार करण्यात आल्याने सीमावर्ती भागामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

या सगळ्या प्रकरणाचे धागेदोरे शोधून काढण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि न्यायवैद्यकचे एक पथक काल शुक्रवार घटनास्थळी दाखल झालं. समोर आलेल्या माहितीनुसार हल्लेखोर दहशतवादी हे दक्षिण काश्मिरमध्येच असल्याचं समजतं, त्यांच्याकडं पुरेशा प्रमाणात रसद आणि अन्य साहित्य असावं असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर मुस्लिम राष्ट्रांकडून पाकिस्तानला पाठिंबा; भारताविरोधात 57 देश एकवटले

या गोळीबारामुळे सीमावर्ती गावांत राहणाऱ्या गावकऱ्यांनीही सुरक्षितस्थळी धाव घ्यायला सुरूवात केली असून अचानक तोफगोळ्यांचा मारा सुरू झालाच तर त्याचा सामना करण्यासाठी वैयक्तिक बंकरची उभारणी केली जात आहे. पाकिस्तानी रेंजर्सनी १ आणि २ मे रोजी कुपवाडा, बारामुल्ला, पूँच, नौशेरा आणि अखनूरमधील भारतीय गावं आणि चौक्यांना लक्ष्य केलं होतं. पाकिस्तानच्या बाजूने गोळीबार सुरू होताच भारतीय लष्करानेही त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले होतं.

पाकिस्तानकडून सुरूवातीला उत्तर काश्मीरमधील कुपवाडा आणि बारामुल्ला या जिल्ह्यांतील चौक्यांना लक्ष्य करण्यात आले त्यानंतर पूँच सेक्टरमधील चौक्यांच्या दिशेनेही गोळीबार करण्यात आला होता, त्यानंतर अशाच प्रकारचा गोळीबार जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्येही झाला होता. राजौरी जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला लागून असलेल्या सुंदरबनी आणि नौशेरा सेक्टरमधील अनेक चौक्यांवर गोळीबार करण्यात आल्यानंतर परगवाल सेक्टरमध्येही अशाच प्रकारे शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. गोळीबाराच्या या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी मोहिमांविषयक महासंचालकांची बैठक पार पडली होती पण त्यानंतर गोळीबाराचे हे सत्र सुरूच होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube