पहलगाम हल्ल्याच्या नावाखाली पुजाऱ्याची फसवणूक, पूजेच्या बहाण्याने खात्यातून पैसे लंपास नेमकं काय घडलं?

money stolen from account of priest’s in name of Pahalgam attack under the pretext of worship : एकीकडे संपूर्ण देशभरात जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या पहेलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. तर दुसरीकडे याच हल्ल्याच्या नावाखाली एका पुजाऱ्याची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काय आहे हे नेमके प्रकरण पाहूयात…
अरूण जगताप यांना अलोट जनसागरात अखेरचा निरोप , पाहा फोटो
उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यामध्ये असलेल्या पनकी या ठिकाणी राहणारे एक पुजारी ज्यांना फोन आला. हा फोन त्यांनी घेतला असता. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने आपण भारतीय सैन्याचे अधिकारी आहोत असं सांगितलं. तसेच काश्मीरमध्ये सैन्याची एक तुकडी रवाना होत आहे. त्यासाठी एक पूजा करायची आहे.. त्यामुळे त्या पूजेचे पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटवर पाठवण्यासाठी तुमचे अकाउंट डिटेल पाठवा असं सांगत. या पुजाऱ्याकडून समोरील व्यक्तीने अकाउंट नंबर मिळवला.
पाकिस्तानचे मनसुबे हाणून पाडा, युद्धासाठी कच खाऊ नका; आंबेडकरांचा मोदींना सल्ला
कृष्ण बिहारी शुक्ला असे या पुजाऱ्याचं नाव असून ते रुद्राभिषेक करतात. तर त्यांना आलेल्या फोन कॉल वरून समोरून सांगण्यात आलं की, कानपूरच्या केंट येथील सैन्यातील अधिकारी बोलत आहेत. ज्यांची तुकडी काश्मीरला रवाना होणार आहे. त्यासाठी रुद्राभिषेक करायचा आहे. मात्र या बहाण्याने त्यांचे संपूर्ण अकाऊंट रिकामे करण्यात आले आहे.
स्टॅम्प पेपर विक्रेते सरकारी नोकर, भ्रष्टाचार केला तर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
त्यानंतर त्याच्या अकाउंट वरून सर्व पैसे गायब करण्यात आले मात्र त्यानंतर या पुजाऱ्याला हा सर्व प्रकार लक्षात आला त्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांमध्ये याबाबत तक्रार नोंदवली तसेच या फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने या पुजाऱ्याला धमकी देखील दिली आहे की पोलिसांकडे तक्रार दिल्यास तुमच्या परिवाराच्या जीवाला धोका आहे मात्र पोलिसांमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर आता या प्रकरणावर तपास सुरू आहे.