पाकिस्तानचे मनसुबे हाणून पाडा, युद्धासाठी कच खाऊ नका; आंबेडकरांचा मोदींना सल्ला

पाकिस्तानचे मनसुबे हाणून पाडा, युद्धासाठी कच खाऊ नका; आंबेडकरांचा मोदींना सल्ला

Prakash Ambedkar : पहलगाममधील दहशतवादी (Pahalgam Terrorist Attack) हल्यानंतर संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. भारताने सिंधू पाणी करार (Indus Water Treaty) रद्द केल्यानं पाकिस्तानने भारताला अणुहल्ल्याची उघड धमकी दिली. दरम्यान, या हल्ल्याच्या निषेधार्ह आणि केंद्र सरकारने पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) थेट अॅक्शन घेण्याची मागणी करत प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) हुतात्मा चौकात आंदोलन केले. यावेळी बोलताना त्यांनी युद्धासाठी भारत सरकारने कच खाऊ नये, युद्धासाठी हालचाली वाढवाव्या, अशी मागणी केली.

स्टॅम्प पेपर विक्रेते सरकारी नोकर, भ्रष्टाचार केला तर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश   

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, पहलगाम संदर्भात आजच सकाळी अधिकृत बातमी आली आहे की, या हल्ल्यात पाकिस्तान आर्मी सहभागी आहे. आम्ही आधीच म्हणालो होतो की, मिलिटरी ॲक्शन घ्यायला तयार आहे. पण, सरकारमधील पॉलिटिकल लीडरशिप कच खाते आहे. लढण्यासाठी जी हिंमत लागते, ती हिंमत सरकारने जुटवावी. एकदा युद्ध करायचं ठरवलं की, जो काही परिणाम होईल, तो परिणाम जनता सहन करायला तयार आहे. जनतेचीही युद्धाची मागणी आहे. त्यामुळं युद्धासाठी भारत सरकारने कच खाऊ नये, युद्धासाठी हालचाली वाढवाव्या, अशी मागणी आंबेडकरांनी केली.

विधानसभेत पराभव, अजितदादांचा फेटा बांधण्यास नकार, माजी आमदाराला अश्रू अनावर 

तिजोरी कमी पडणार असेल, तर जनता ही स्वतःची तिजोरी भरायला सुद्धा तयार आहे, जनभावनेचा फक्त आदर करून चालणार नाही, थेट कृती करावी, असंही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश देणे आणि मंत्रिमंडळाने आदेश देणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जोपर्यंत मंत्रिमंडळ निर्णय घेत नाही, तोपर्यंत प्रेसिडेंट हे आर्मीला निर्देश देऊ शकत नाही. आपली आर्मी खूप डिसीप्लीन आहे. आपली आर्मी लक्ष्मण रेषा क्रॉस करणार नाही. मात्र, पुन्हा लोक काश्मीरमध्ये केले पाहिजेत, त्या अनुषंगाने केंद्र शासनाने पाऊल उचलली पाहिजेत, असंही आंबेडकर म्हणाले.

उत्तर भारतामध्ये साधारण जुलै महिन्यात पाऊस येतो. केंद्र सरकारने प्रत्येक भागातील ज्या टुरिस्टना काश्मीरमध्ये जायचं आहे, त्यांना त्या-त्या राज्यांनी तशी सोय तिथं करावी. आणि केंद्र सरकारने पूर्ण संरक्षण द्यावं. असं केलं तर जे काही मनसुबे पाकिस्तान आर्मीचे आहेत, ते आपण हाणून पाडू शकतो, असं आंबेडकर म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube