धक्कादायक! भाजप नेत्याने पत्नी आणि 3 मुलांवर गोळ्या झाडल्या; तिघांचाही मृत्यू, पत्नीची प्रकृती गंभीर

BJP Leader Killed Wife And Three Childern Shot Dead : उत्तर प्रदेशमधून (Uttar Pradesh) एक धक्कादायक घटना समोर आलीय. भाजप (BJP) नेत्याने पत्नीसह तीन मुलांवर गोळ्या झाडल्याचं समोर आलंय. ही घटना सहारनपूर जिल्ह्यातील गंगोह येथील संगाखेडामध्ये घडली आहे. या हल्ल्यात चौघेही गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले (Crime News) होते. तिथे मुलगा शिवांश, देवांश आणि मुलगी श्रद्धा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
भाजप जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य योगेश रोहिला यांनी त्यांची पत्नी नेहा (32), शिवांश (04), देवांश (07), श्रद्धा (08) यांच्यावर गोळ्या झाडल्याचे वृत्त आहे. चौघेही गंभीर जखमी झाले. गोळीचा आवाज आणि आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातील लोक घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. भाजप नेत्याने घरातच गोळीबार केला होता. चौघांच्याही डोक्यात गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती मिळतेय.
नागपूर दंगलीतील नुकसानीची वसुली होत नाही; कारण देत जरांगेंनी फडणवीसांना आठवून दिला जुना शब्द
मात्र, पोलिसांनी आरोपी भाजप नेत्याला घटनास्थळावरूनच अटक केली आहे. भाजप नेते योगेश राहिले काही दिवसांपासून मानसिकदृष्ट्या ठीक नव्हते, अशीही माहिती मिळतेय. त्यांच्याकडे परवानाधारक पिस्तूल असल्याचे सांगितले जातेय. याच पिस्तुलने त्यांनी आपल्या पत्नी अन् मुलांवर बेछूट गोळीबार केलाय. घटनेतील सर्व जखमींना रुग्णालयात नेण्यात आलंय. तर पोलिसांनी आरोपीला पोलीस ठाण्यात नेलंय.
न्यायमूर्ती यशवंत वर्मा कोण? ज्यांच्या बंगल्यात सापडला नोटांचा ढीग, ‘अशी’ होती त्यांची कारकीर्द…
घटनास्थळी तपास सुरू आहे. शिवांश, देवांश आणि मुलगी श्रद्धा यांचा रुग्णालयात मृत्यू झाला तर पत्नी रुग्णालयात जीवन आणि मृत्यूशी झुंज देत आहे. भाजप नेत्यावर मानसिक आजारावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. तो औषधोपचारावर घेत असल्याची माहिती मिळतेय. घटनेमुळे परिसरात मोठं दहशतीचं वातावरण आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.