नागपूर दंगलीतील नुकसानीची वसुली होत नाही; कारण देत जरांगेंनी फडणवीसांना आठवून दिला जुना शब्द

नागपूर दंगलीतील नुकसानीची वसुली होत नाही; कारण देत जरांगेंनी फडणवीसांना आठवून दिला जुना शब्द

Manoj Jarange Patil Warning To Devendra Fadnavis : नागपुरमधील हिंसाचारस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) आढावा घेतला. यावेळी त्यांनी आता जे नुकसान झालंय ते दंगेखोरांकडून वसूल केलं जाईल. ते पैसे त्यांनी भरले नाहीतर तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाणार असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. यावर आता मनोज जरांगे यांनी (Manoj Jarange Patil)  नागपूर हिंसाचारातील नुकसान भरपाई मिळणार नाही. देवेंद्र फडणवीसांचं काही खरं नाही. मराठ्यांच्या पोरांवरील केस मागे घेणार होते, अजून एकही मागं नाही घेतली अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिलाय. त्यांनी पुन्हा मराठा आरक्षणावरून तंबी दिली आहे. फडणवीसांचं काही खरं नाही, दंगलीतील नुकसानीची वसुली करत नाही. कारण आमच्या पोरांचे अद्याप गुन्हे मागे घेतलेले नाहीत. सरकारला पायाखाली लोळवलं नाही ना, तर जात मराठ्यांची नाही असं देखील जरांगे पाटलांनी बजावलं आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, माझ्या नादी लागायचं नाही. माझ्या समाजाशी दगाफटका केला तर तुमच्या आनंदावर विरजन टाकीन. मी फडणवीसांना बोलत नाही. जेवढे महायुती सरकारमधील आमदार-खासदार आहेत, त्यांनी माझ्या समाजला आरक्षण द्या. मी एकदा नादी लागलो तर जिरवीलच असा इशारा देखील त्यांनी दिलाय.

दिशा सालियन प्रकरण : ठाकरेंच्या दोन फोनचे संभाषण सांगत राणेंनी ठेवणीतले ‘पत्ते’ उघडले

फडणवीसांचं बेगडी हिंदुत्व आहे. कोरटकर, सोलापुरकर हे फडणवीसांचे पाहुणे आहेत. औरंग्याची कबर कुणाला माहीत नव्हती. फडणवीसांनी सगळ्या महाराष्ट्राला माहीत करून दिली, असा आरोप मनोज जरांगे यांनी केलाय. सत्तर-पंचाहत्तर (Maratha Reservation) वर्ष यांनी वापर करून घेतला. कबर काढणारे हेच आणि त्याला पोलीस संरक्षण देणारे हेच. यांना दंगली घडवायच्या आहेत. सुड आणि क्रुर भावनेने वागणारा माणूस फडणवीस असल्याची टीका मनोज जरांगे यांनी केलीय.

आम्हाला संघटना उभी करायची गरज नाही. सेवकांच्या माध्यमातून प्रश्न सुटले नाही, तर आंदोलनाच्या माध्यमातून सोडवू. मुंबईला जायचं आम्ही अचानक ठरवू. या आमदार मंत्र्यांच्या चेहऱ्यांवर मराठ्यांमुळं आनंद आहे. मराठ्यांच्या मतांवर निवडून आले आहेत, म्हणून मराठ्यांना आरक्षण द्या अशी मागणी जरांगे पाटलांनी केलीय.

फडणवीस कावेबाज माणूस, त्यांना औरंगजेबाची कबर काढायचीच नाही फक्त फोकसला आणली; जरांगेंचं टीकास्त्र

फडणवीसांनी बेईमानी करून नये. कोरटकरची प्रॉपर्टी जप्त केली का? संतोष देशमुखांचे हत्येतील कोणते आरोपी धरले? आरोपीला लपून ठेवणारे आरोपी होत नाहीत का? फडणवीसाचं काही खरं नाही, तो दंगलीतील नुकसानीची वसुली करत नाही कारण आमच्या पोरांचे अद्याप गुन्हे मागे घेतलेले नाहीत, असं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube