न्यायमूर्ती यशवंत वर्मा कोण? ज्यांच्या बंगल्यात सापडला नोटांचा ढीग, ‘अशी’ होती त्यांची कारकीर्द…

न्यायमूर्ती यशवंत वर्मा कोण? ज्यांच्या बंगल्यात सापडला नोटांचा ढीग, ‘अशी’ होती त्यांची कारकीर्द…

Huge Amount Recovered From Delhi High Court Judge Bungalow : दिल्ली उच्च न्यायालयाच्या (Delhi High Court) एका न्यायाधीशांच्या घरात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली. त्यानंतर त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यामुळं हे न्यायाधीश साहेब चर्चेत आलेत. हे प्रकरण (Delhi High Court Judge) आहे, दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या (Yashwant Verma) संदर्भातील. अलीकडेच दिल्लीतील त्यांच्या सरकारी बंगल्यात आग लागली होती.

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, आगीची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या पथकाला आग विझवताना त्याच्या बंगल्यात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळली. बंगल्यात एवढी मोठी रक्कम पाहून कर्मचारी थक्क झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती दिली. मात्र, जेव्हा हे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले, तेव्हा एकच गोंधळ उडाला.

नवीन काऊंटी स्थापन करून चीनचे लद्दाखमध्ये घुसखोरीचे प्रयत्न; भारताचं चीनला कडवं प्रत्युत्तर!

कपिल सिब्बल म्हणतात…

त्यांच्या बंगल्यात एवढी मोठी रक्कम कशी आली? हा अजूनही तपासाचा विषय आहे. तर याप्रकरणी ज्येष्ठ वकील आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी म्हटलंय की, हा एक गंभीर विषय आहे. अनेक वर्षांपासून असं घडत आलंय. आता वेळ आलीय की, सुप्रीम कोर्टाने न्यायाधीशांच्या नियुक्ती प्रक्रियेकडे लक्ष देणं गरजेचं आहे, असं ज्येष्ठ वकील आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी म्हटलंय.

चॅटजीपीटीचा गजब दावा! वडिलांनाच म्हटलं स्वतःच्या मुलांचा खुनी, 21 वर्षांची शिक्षाही…OpenAI विरोधात खटला

तर सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष विकास सिंह म्हणाले की, या घटनेला एक आठवडा होत आलाय. त्यामुळे आता न्यायाधीशांकडून कोणतं स्पष्टीकरण येण्याची शक्यता नाहीये. असं असेल तर हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. ट्रान्सफर हे या समस्येचं निराकरण नाहीये. हा पैसा त्यांच्याकडे कसा आला, याचं स्पष्टीकरण त्यांच्याकडे नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विकास सिंह यांनी केलीय.

यशवंत वर्मांची कारकीर्द कशी होती?

06 जून 1969 रोजी जन्मलेले यशवंत शर्मा यांनी 1992 मध्ये रेवा लॉ युनिव्हर्सिटीमधून कायद्याची पदवी प्राप्त केली. यानंतर, त्यांनी 08 ऑगस्ट 1992 रोजी वकील म्हणून नोंदणी केली. यानंतर, त्यांच्या कारकिर्दीत यशाचा मार्ग मोकळा होऊ लागला. त्यानंतर ते 2006 पर्यंत अलाहाबाद उच्च न्यायालयात विशेष वकील राहिले. यानंतर, यशवंत वर्मा 2012 ते 2013 पर्यंत उत्तर प्रदेश सरकारचे मुख्य स्थायी परिषद होते.

2014 मध्ये अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती

यशवंत वर्मा यांची 13 ऑक्टोबर 2014 रोजी अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. यानंतर, त्यांनी 1 फेब्रुवारी 2016 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. त्यानंतर 11 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांची दिल्ली उच्च न्यायालयात बदली झाली. पण आता पुन्हा त्यांना अलाहाबाद उच्च न्यायालयात स्थानांतरित करण्याची शिफारस करण्यात आलीय.

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना अलाहाबाद उच्च न्यायालयात परत पाठवण्याची शिफारस केलीय. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील तीन वरिष्ठ न्यायाधीशांच्या कॉलेजियमने न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना अलाहाबाद उच्च न्यायालयात पाठवण्याची शिफारस केली आहे. दिल्लीतील न्यायमूर्ती यशवंत यांच्या सरकारी बंगल्यात आग लागल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube