नागपुरातील हिंसाचाराचा पहिला बळी; जखमी इरफान अन्सारीचा मृत्यू , तणावाचं वातावरण

नागपुरातील हिंसाचाराचा पहिला बळी; जखमी इरफान अन्सारीचा मृत्यू , तणावाचं वातावरण

Nagpur Violence Infar Ansari Death : नागपुरातील (Nagpur) हिंसाचारात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. त्यामुळं राज्यात मोठं तणावाचं वातावरण आहे. औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून नागपूरमध्ये 17 मार्च रोजी दोन गटात मोठी दंगल उसळली होती. या हिंसाचारामध्ये इरफान अन्सारी नावाचा 38 वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर मेयो रूग्णालयामध्ये उपचार सुरू होता. मागील दोन दिवसांपासून (Nagpur Violence) त्याची प्रकृती गंभीर होती.

दरम्यान आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास या जखमी व्यक्तीचा मृत्यू (Nagpur Crime News) झाला. यानंतर मेयो रूग्णालयासमोर मोठी गर्दी जमा झाली होती. नागपूरमध्ये मोठं तणावाचं वातावरण असून मेयो रूग्णालय परिसरामध्ये कडक बंदोबस्त तैनात केला गेला आहे. या भागात सशस्त्र जवान देखील तैनात केले आहेत.

चॅटजीपीटीचा गजब दावा! वडिलांनाच म्हटलं स्वतःच्या मुलांचा खुनी, 21 वर्षांची शिक्षाही…OpenAI विरोधात खटला

यासोबतच मोमीनपुरा हंसापुरी चिटणीस पार्क चौक आणि भालदार पुरासह तहसील लकडगंज (Nagpur News) गणेश पेठ भागात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला गेला आहे . इरफान अन्सारीच्या मृत्यूनंतर मोठी खळबळ उडाल्याचं दिसतंय.

सोमवारी महाराष्ट्रातील नागपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवानंतर, औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या निदर्शनांना हिंसक वळण लागले. या घटनेत 15 हून अधिक पोलीस आणि 5-6 नागरिक जखमी झाले, तर 25 हून अधिक लोकांना याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलं होतं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा वापर करावा लागला होता.

Video : नागपुरात हिंसाचार घडवणाऱ्यांची प्रॉपर्टी विकली जाणार; फडणवीसांनी दिले थेट आदेश

पोलिस आणि प्रशासनाने लोकांना अफवांकडे लक्ष देऊ नका, असं म्हटलंय. तर नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केलंय. जुने व्हिडिओ व्हायरल होण्याची शक्यता लक्षात घेऊन, लोकांना सावधगिरी बाळगण्यास सांगण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नागपूरकरांना संयम राखण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केलंय

कारवाई करत पोलिसांनी या प्रकरणी 25 हून अधिक जणांना ताब्यात घेतलं होतं. सायबर पोलिसांनी सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांची चौकशी सुरू केली असून 100 हून अधिक संशयास्पद व्यक्तींची चौकशी सुरू आहे. काही व्हिडिओ फुटेजच्या आधारे गुन्हेगारांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळतेय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube