Nagpur Violence : अंधाराचा फायदा घेत महिला पोलिसाची वर्दी खेचली; CCTV ताब्यात, गुन्हाही दाखल

Nagpur Violence : अंधाराचा फायदा घेत महिला पोलिसाची वर्दी खेचली; CCTV ताब्यात, गुन्हाही दाखल

Nagpur Violence : नागपूर हिंसाचारात एक धक्कादायक (Nagpur Violence) घटना घडली होती. जी आता समोर आली आहे. या हिंसाचारा दरम्यान एका ठिकाणी सोमवारी महिला पोलीस आपल्या ड्युटीवर असताना अंधाराचा फायदा घेत जमावाने त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना आता उजेडात आली असून या प्रकरणी पोलिसांनी कारवाईस सुरुवात केली आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या दंगलखोरांवर गणेशपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपूरमध्ये सोमवारी रात्री दोन गटात तुफान दगडफेक होऊन दंगल उसळली होती. दगडांचा तुफान मारा सुरू होता. काही कळण्याच्या आत ही घटना घडल्याने मोठा गोंधळ उडाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी कसोशीने प्रयत्न केले. हजारो पोलीस कर्मचारी ठिकठिकाणी दंगल आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते. विशेष म्हणजे, यात महिला पोलीस कर्मचारी देखील कर्तव्यावर होत्या. याच दरम्यान एक संताप आणणारी घटना घडली.

नागपूर हिंसाचारातील समाज कंटकांबाबत पोलीस आयुक्तांची महत्त्वाची माहिती

हिंसाचार नियंत्रित करण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिसाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला. काही माथेफिरूंनी पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. यानंतर गणेशपेठ पोलिसांनी असे कृत्य करणाऱ्या जमावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याच ठिकाणी जमावाने महिला पोलिसांना शिवीगाळ देखील केली. यातीलच काही जणांनी अश्लील शेरेबाजी देखील केली. अत्यंत संताप आणणाऱ्या या घटना हिंसाचारा दरम्यान घडल्या. दरम्यान,  पोलिसांनी या जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरचे सीसीटीव्ही ताब्यात घेतले आहेत. आता या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

घटना पूर्वनियोजित होती का ?

दरम्यान हे दगड नेमके कुठून येत होते? हा हल्ला पूर्वनियोजित तर नव्हता ना, असे सवाल निर्माण होत आहेत. यावर आता नागपूर पोलिसांनीच कालच्या घटनेसंदर्भात मोठा खुलासा केला. नागपूर शहर सोमवारी सूर्यास्तानंतर दगडफेक आणि जेसीबी वाहनांच्या धुरानं अचानक वेढलं. दोन्ही बाजूंच्या जमावाकडून घोषणाबाजी आणि विटांचा जीवघेणा मारा सुरू होता. या हल्ल्यात तीसहून अधिक पोलीस गंभीर जखमी झाल्याची माहिती (Nagpur News) आहे. या हल्ल्याची पार्श्वभूमी सोमवारी निघालेल्या औरंगजेबा कबर हटविण्याचा मागणी करणाऱ्या मोर्चाची होती असे सांगितले जात आहे. हा पूर्वनियोजित कट होता असे राजकीय वर्तुळातून सांगितले जात आहे. पोलिसांच्या एफआयआरमधूनही या दंगलीसंदर्भात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हल्ला पूर्वनियोजित..जीवघेणा वीटांचा मारा, इतके दगड कुठून आले? नागपूर पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube