हल्ला पूर्वनियोजित…जीवघेणा वीटांचा मारा, इतके दगड कुठून आले? नागपूर पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

हल्ला पूर्वनियोजित…जीवघेणा वीटांचा मारा, इतके दगड कुठून आले? नागपूर पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

Police Narrated Story Of Nagpur Violence Over Aurangzeb : नागपूरमध्ये (Nagpur) काल औरंगजेबाच्या कबरीवरून वाद (Aurangzeb Tomb) चिघळला. दोन गटांमध्ये मोठी दंगल देखील झाली, इतकंच नाही तर पोलिसांवर थेट दगडांचा पाऊस पडल्याचं पाहायला मिळालं. अनेक पोलीस कर्मचारी यामध्ये जखमी (Nagpur Violence) झालेत. दोन्ही गटांकडून दगडांचा मारा थांबतच नव्हता. त्यामुळे हे दगड नेमके कुठून येत होते? हा हल्ला पूर्वनियोजित तर नव्हता ना, असे सवाल निर्माण होत आहेत. यावर आता नागपूर पोलिसांनीच कालच्या घटनेसंदर्भात मोठा खुलासा केलाय.

नागपूर शहर काल सुर्यास्तानंतर दगडफेक आणि जेसीबी वाहनांच्या धुरानं अचानक वेढलं. दोन्ही बाजूंच्या जमावाकडून घोषणाबाजी आणि विटांचा जीवघेणा मारा सुरु होता. या हल्ल्यात तीसहून अधिक पोलीस गंभीर जखमी झाल्याची माहिती (Nagpur News) मिळतेय. या हल्ल्याला पार्श्वभूमी सोमवारी निघालेल्या औरंगजेबा कबर हटविण्याचा मागणी करणाऱ्या मोर्चाची होती.

मुलींच्या हॉस्टेलमध्ये दारुच्या बाटल्या अन् सिगारेटच्या पाकिटांचा मोठा ढीग! ‘तक्रार केली पण…’ पुण्यात भयंकर घडतंय

नागपूरातील महाल परिसरातील दोन गटात कालच्या मोर्चानंतर अफवा पसरली. त्यानंतर दोन गटात भयंकर राडाल झाला. दगडांच्या माऱ्यामुळे अनेक पोलीस जखमी झाले होते. तर कुऱ्हाडीचा घाव हातावर झेलत डीसीपी निकेतन कदम यांनी टीमला वाचवलं. आमच्याकडे सर्व सीसीटीव्ही फुटेज असून त्याआधारे आम्ही समाजकंटकांना शोधून काढू, असं देखील निकेतन यांनी स्पष्ट केलंय.

कालच्या घटनेत मला सुरुवातीला दगडांमुळे पायाला जखम झाली. मात्र परिस्थिती बिकट असल्याने माझे जखमेकडे लक्ष नव्हते. परंतू जेव्हा आम्ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश मिळविल्यानंतर थोड्या वेळाने मला झालेल्या जखमेतून वेदना होऊ लागल्याचे पोलिस उपायुक्त अर्चित चांडक म्हणाले. आपल्याला डॉक्टरांनी तपासल्यानंतर शस्रक्रियेची काहीही गरज नसल्याचे म्हटलेय.. मात्र डॉक्टरांनी आराम करण्यास सांगितल्याचेही त्यांनी सांगितले.

नागपूर दंगलीनंतर फडणवीसांची राणेंना समज? पण बाहेर येताच राणे म्हणाले…

पोलीस उपायुक्त अर्चित चांडक म्हटले की, शक्यता नाकारता येत नाही. हल्ला ठरवून देखील केलेला असु शकतो. घटनास्थळी बांधकाम सुरू होतं. त्यातील सिमेंटच्या विटा हल्लेखोरांनी पोलिसांवर फेकल्या. त्यामुळेच जास्त पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. आम्ही खाकी वर्दी घातली आहे, आमचं कर्तव्य कायदा सुव्यवस्था राखणे हेच आहे. सोबतच त्यांनी सर्वांनी शांतता ठेवावी आणि पोलिसांना सहकार्य करावं, असं आवाहन केलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube