Nagpur Hit & Run Case : अपघाताच्या आधी संकेतने दारु, बीफ कटलेट खाल्लं; सुषमा अंधारेंचा दावा
Sushma Andhare Speak On Nagpur Hit & Run Case : अपघाताच्या आधी संकेत बावनकुळेने दारु, बीफ कटलेट खाल्लं असल्याचा दावा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलायं. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचे चिरंजीव संकेत बावनकुळे यांच्या भरधाव वेगातील ऑडी कारचा अपघात घडल्याची घटना घडली. या प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आरोपांच्या फेऱ्या झाडल्या आहेत. अंधारे नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
..म्हणून अजितदादा बारामतीतून निवडणूक लढवायला घाबरतात; माजी मंत्र्याने कारणही सांगितलं
सुषमा अंधारे म्हणाले, संकेत बावनकुळेचं दारु, बीफ कटलेट खाऊन झाल्यानंतर मणकापुरात त्यांच्या गाडीने पहिली धडक दिली. या ठिकाणी त्यांना चोप देण्यात आला तिथून पोलिस ठाण्यात नेलं जात असताना त्यांनी तिथून पळ काढला. पळून जाण्याच्या प्रयत्नात संकेत बावनकुळेंच्या गाडीने रामदास पेठमध्ये पुन्हा तीन गाड्या ठोकल्या, त्यातील एक गाडी नागपूर प्रेस क्लबचे जितेंद्र सोनकांबळे यांची गाडी होती, त्यांनी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र, गुन्हा दाखल करुन घेण्याची त्यांची इच्छा नव्हती. शेवटी विम्यासाठी तरी गुन्हा दाखल करा अशी विनंती केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला मात्र, एफआयआरमध्ये गाडीची माहिती समोर आली नसल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केलायं.
Video : शिमल्यात मशिदीवरून सुरू असलेला वाद चिघळला; पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज
तसेच अपघातानंतर सेम डेला आरोपी ताब्यात घेतलं असल्याचं सांगितलं जात आहे मात्र, जर सेम डेला आरोपी ताब्यात घेतले तर गाडी कुठे आहे . गाडीचे डिटेल्स एफआयआरमध्ये नाहीत. पोलिस ठाण्याचे पीआय काय लपवत आहेत? मेडिकलसाठी तिन्ही लोकांना का नाही पाठवलं? संकेतचं मेडिकलला का केलं गेलं नाही? जर गाडी एकच जण चालवत होता तर तुम्ही इतर दोघांचं मेडिकल का केलं? गाडीचा पंचनामा का केला नाही? या प्रश्नांची सरबत्ती सुषमा अंधारे यांनी केलीयं.
…अन् बावनकुळे अचानक संध्याकाळी प्रकट झाले :
अपघातग्रस्त गाडी ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे चिरंजीव संकेत बावनकुळेंची आहे. हे पोलिसांना कळलंच नाही आणि संध्याकाळी अचानक प्रकट होऊन बावनकुळे साहेब समोर येऊन सांगताहेत की माझ्या मुलाची गाडी आहे, चौकशी करा हे आश्चर्यजनकच असल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
अपघातग्रस्त गाडीचं वय 28 दिवस असून गाडी नवीन आहे. या गाडीत काहीच बिघाड नाही. अपघातावेळी गाडी 150 च्या वेगाने होती. नवीन गाडी अशी बंद पडू शकत नाही. रॅश ड्राईव्हिंगमुळे हा अपघात झाला आहे. गाडी पोलिस ठाण्यात आणली पाहिजे पण गाडी थेट गॅरेजमध्ये नेण्यात आली होती. सोमवारी यावर जेव्हा आम्ही आवाज उठवला तेव्हा ही गाडी पुन्हा पोलिस ठाण्यात आणली गेली याचे व्हिडिओ फुटेज ट्विटरवर पोस्ट केले असल्याचं सुषमा अंधारेंनी स्पष्ट केलंय
दरम्यान, या प्रकरणी जखमी झालेल्या लोकांवर कुठे उपचार सुरु आहेत, ते लोकं किती जखमी आहेत, यासंदर्भातील बातम्या कुठेच आलेल्या नाहीत. एकाही प्रिंटला यासंदर्भातील बातम्या नाहीत, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केलायं.