तडीपार लोकांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सुषमा अंधारेंचा अमित शहांच्या टिकेवर पलटवार
Sushma Andhare press conference : नुकत पुण्यात भाजपचं प्रदेश महाधिवेश झालं. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार घणाघात केला. त्यावर आता ठाकरे गटाच्या (Sushma Andhare) नेत्या सुषमा अंधारे यांनी पलटवार केला आहे. फडणवीस आणि शाह हे दोघेही एकसारखंच अघळपघळ बोलतात. देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील अधिवेशनात ज्याप्रकारे भूमिका मांडली ते पाहता फडणवीस हेच फेक नरेटिव्हचं सर्वात मोठे केंद्र असल्यासारखं वाटतात अशी थेट टीका अंधारे यांनी केली आहे. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
मराठा आरक्षण प्रश्न मांडा खासदार ओमराजे निंबाळकरांनी सभागृह गाजवलं; प्रधानमंत्री पीक विमा योजना नक्की कुणासाठी?
इथला हिंदू हिंसक नाही. भाजप पक्ष कायमच हिंसा करतो. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक म्हणजे सकल हिंदू अशी भाजपची समजूत आहे. राज्यातील मराठा आणि ओबीसी समाजाला भाजप का खेळवत आहे? राज्यात जातीय विषपेरणी करू नका, आरक्षणाचा तोडगा काढा. दिल्लीत संसदेचं अधिवेशन सुरु आहे. भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी लोकसभेत मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मांडावा. तुमची नियत मराठा समाजाला कळू द्या, असं थेट आव्हानही अंधारे यांनी त्यांना दिलं आहे
आम्हाला अमित शाह यांच्यावर बोलायचं नाही. तडीपार लोकांनी महाराष्ट्रात येऊन आम्हाला शहाणपणा सांगण्याची गरज नाही. आम्ही कोण आहोत, आम्ही काय आहोत? याचं सर्टिफिकेट गुजरातच्या तडीपार माणसाकडून घेण्याची गरज वाटत नाही. आमचं सर्टिफिकेट गुजरातच्या तडीपराकडून घेण्याची वाईट वेळ आलेली नाही. ज्यांच्या हातावर जस्टिस लोया यांच्या खुनाचे डाग आहेत, त्यांनी आम्हाला सर्टिफिकेट देऊ नये, अशी जहरी टीकाही सुषमा अंधारे यांनी केली. अमित शाह यांनी भाजपच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांचा उल्लेख औरंगजेब फॅन्स क्लबचे अध्यक्ष असा केला होता. त्याला त्यांनी वरील भाषेत उत्तर दिलं आहे.
औरंगजेब फॅन क्लब मला कुणी विरोधक नाही; असं का म्हणाले नगरचे खासदार? पाहा लेट्सअप मराठीवर बेधड निलेश लंके
शंकराचार्य मातोश्रीवर आल्यापासून तुम्हाला पोटशुल उठलं आहे. तुम्हाला आता मुद्दे मिळत नाहीत. अदानींच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली तेव्हा तुमची आर्थिक रसद तुटते का? असं वाटायला लागलं म्हणून औरंगजेब फॅन क्लब अशी भाषण करत आहात, तुमचा स्तर किती खाली गेला आहे, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. तसंच, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांना विरोधी बाकावर बसण्यासाठी शुभेच्छा असा टोलाही सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.