पुन्हा अशा प्रकारची अवमानस्पद वागणूक देऊ नये; किरीट सोमय्यांचा ‘लेटरबॉम्ब’, दानवे, बावनकुळेंवर संतापले
Kirit Somaiya On Raosaheb Danve, Chandrashekhar Bawankule: विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election 2024) निवडणूक व्यवस्थापन समिती भाजपने जाहीर केलीय. या समितीत किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनाही घेण्यात आले. पण समितीतून भाजपमधील संघर्ष उघडकीस आलाय. सोमय्यांनी समितीतून नाव काढून टाकावे, यासाठी पत्र लिहिले आहे. त्यांनी निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना संतापजनक पत्र लिहिले आहे.
आमदार रोहित पवारांचा दावा! दंतकथा अन् अफवाच..,; भाजपच्या नेत्याची चपराक…
विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली असून, अध्यक्षपदाची जबाबदारी रावसाहेब दानवे यांच्यावर देण्यात आली आहे. तर निवडणूक आयोग संपर्कप्रमुख म्हणून किरीट सोमय्या यांच्यावर जबाबदारी देण्यात आलीय. त्यानंतर किरीट सोमय्यांनी लेटरबॉम्ब टाकला आहे. सोमय्या यांनी रावसाहेब दानवे यांना पत्र लिहिले आहे. आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केलीय. ही पद्धत चुकीची आहे. मला अमान्य आहे. आपण यासाठी अन्य कोणाची तरी नियुक्ती करावी. 18 फेब्रुवारी 2019 रोजी भाजप-शिवसेना यांची ब्ल्यू सी हॉटेल वरळी येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे यांच्या आग्रहामुळे भाजप नेत्यांनी मला पत्रकार परिषद सोडून जाण्याची निर्देश दिले दिले. तेव्हापासून आजपर्यंत मी भाजपचा एक सामान्य सदस्य व कार्यकर्ता म्हणून काम करित आहे.
… म्हणून बापू पठारे सोडणार भाजपची साथ, लेट्सअप मराठीशी बोलताना केला मोठा खुलासा
मधल्या काळात ठाकरे सरकारचे घोटाळे काढण्याची जबाबदारी मी स्वीकारली होती. माझ्यावर तीनवेळा जीवघेणे हल्ले झाले तरीही मी जबाबदारी पार पाडली. गोली साडेपाच वर्षे सामान्य सदस्य म्हणून माझ्यावर प्रेम करत आहात ते पुरेसे आहेत. या विधानसभा निवडणुकीसाठी मी स्वतःपूर्णपणे झोकडून दिले आहे. मी काम करतो. करीत राहणार आहे. आपल्या या समितीचा मी सदस्य नाही. आपण व प्रदेश अध्यक्षाने पुन्हा अश्या प्रकारची अपमानास्पद वागणूक देऊ नये, अशी विनंती करतो, असे किरीट सोमय्या यांनी पत्रात म्हटले आहे.
किरीट सोमय्या यांनी रावसाहेब दानवे व चंद्रशेखर बावनकुळे यांनी खरमरीत पत्र लिहिलेय. @KiritSomaiya #BJp #maharashtraElection2024 #maharashtraassembly pic.twitter.com/V8X1YozL9y
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) September 10, 2024
लगेच सोमय्या यांना समितीतून काढले
सोमय्या यांच्या पत्रानंतर त्यांना निवडणूक व्यवस्थापन समितीतून काढण्यात आलेय. त्यांची जागी प्रदेश मुख्यसह प्रवक्ता विश्वास पाठक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.