Harshvardhan Jadhav : … तर रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध लोकसभा निवडणूक लढवणार, सासरे-जावई वाद पेटणार

  • Written By: Published:
Harshvardhan Jadhav : … तर रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध लोकसभा निवडणूक लढवणार, सासरे-जावई वाद पेटणार

आपल्या पक्षाने आपल्याला संधी दिल्यास कन्नड मतदारसंघातून विधानसभा (संजना जाधव यांच्याविरुद्ध) आणि जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणार अशी माहिती माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिली आहे. केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला आहे.

हर्षवर्धन जाधव यांनी हैद्राबाद येथे जाऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएस यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. लवकरच चंद्रशेखर राव यांची छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर सभा घेणार असल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले आहे. हर्षवर्धन जाधव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. २००९ साली त्यांनी कन्नडमधून मनसेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती व ते आमदार झाले होते. आता ते भारत राष्ट्र समिती मध्ये प्रवेश केला आहे.

ठाकरे- फडणवीस एकत्र येताच पत्रकाराने थेट विचारले नवी युती का?

सासरे विरुद्ध जावई

भारत राष्ट्र समिती मध्ये प्रवेश करताच हर्षवर्धन जाधव यांनी आपले सासरे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या विरोधात दंड थोपटले आहेत. पक्षाने जबाबदारी दिल्यास आपण रावसाहेब दानवे यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवणार, असं ते म्हणाले आहेत.

त्याचवेळी त्यांनी कन्नड या आपल्या पारंपरिक विधानसभा मतदारसंघातून देखील निवडणूक लढवणार असल्याच सांगितलं आहे. कन्नड मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी संजना जाधव याही निवडणुकीची तयारी करत आहेत, त्यामुळे पती विरुद्ध पत्नी असा सामनाही रंगू शकतो.

अपात्र ठरवा, तुरुंगात टाका प्रश्न विचारणारचं; पत्रकार परिषदेत राहुल गांधींचा रूद्रावतार

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube