अपात्र ठरवा, तुरुंगात टाका प्रश्न विचारणारचं; पत्रकार परिषदेत राहुल गांधींचा रूद्रावतार

  • Written By: Published:
Httpswww.canva.comdesignDAFcJmY7 AA2pbVhvfb_idY9UrtjK05lwviewium=link&utm_source=shareyourdesignpanel (9)

Rahul Gandhi Press Conference : मानहानीच्या प्रकरणात सुरत कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर आणि लोकसभेचे सदस्यत्व गमावल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधींनी आज मीडियाला संबोधित करत आहेत. भारतात लोकशाहीवर हल्ला होत असल्याचे मी तुम्हाला अनेकदा सांगत, काहीही झाले तरी मी प्रश्न विचारणे सोडणार नसल्याचे ते म्हणाले. एवढेच नव्हे तर, माझ्या पुढच्या भाषणापूर्वीच मोदी घाबरले आणि माझ्यावर अशा प्रकारची कारवाई करण्यात आल्याचे राहुल गांधी म्हणाले.

 मोदी-अदानी यांचे संबंध काय? ते २० हजार कोटी कोणाचे?

राजकारण ही माझ्यासाठी फॅशनची गोष्ट नाही. खरे बोलणे ही माझ्यासाठी नवीन गोष्ट नाही. ही माझ्या आयुष्याची तपश्चर्या आहे. तुम्ही मला अपात्र ठरवा, मला मारहाण करा, तुरुंगात टाका. पण मला माझी तपश्चर्या पूर्ण करायचीच असल्याचा दृढ विश्वास राहुल गांधींनी यावेळी व्यक्त केला. या देशाने मला प्रेम दिले आहे. म्हणूनच मला हे सगळं त्याच्यासाठी करावं लागत असल्याचे राहुल म्हणाले.

विसरू नका, आमच्याकडेही पायताणं आहेत; बाळासाहेब थोरातांचा सरकारला सज्जड इशारा

लोकसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप

यावेळी राहुल गांधींनी लोकसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. सभागृहातील गंभीर कृत्यांबाबत त्यांनी अनेकदा लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिल्याचं ते म्हणाले. मी संसदेत मोदी आणि अदानींच्या नात्याबाबत प्रश्न विचारला होता. त्यांचं नातं हे खूप जून आहे. त्यानंतर माझं भाषण बंद करण्यात आलं. याबाबत लोकसभा अध्यक्षांना डिटेल रिपोर्ट पाठवला, मात्र त्याला काहीच उत्तर आले नाही. त्यानंतर आपण अध्यक्षांच्या चेंबरमध्ये गेलो आणि मला नियमानुसार बोलू दिले जात नसल्याचं सांगितलं. यावर अध्यक्षांनी हास्य करत मी काहीही करु शकत नसल्याचे उत्तर दिले. त्यानंतर काय घडले हे आपण सर्व जण पाहत असल्याचे राहुल म्हणाले. मूळ प्रश्न असा आहे की अदानी यांच्या कंपनीमध्ये आलेले २० हजार कोटी कोणाचे आहेत. जर हे पैसे आमच्या मुख्यमंत्र्यांचे असतील तर त्यांना जेलमध्ये टाका. पण या प्रश्नाचं उत्तर दिल पाहिजे.

Tags

follow us