‘2024 साली किरीट सोमय्या स्टार प्रचारक राहणार का?’ बावनकुळेंनी एका वाक्यात सांगितले

‘2024 साली किरीट सोमय्या स्टार प्रचारक राहणार का?’ बावनकुळेंनी एका वाक्यात सांगितले

Chandrashekhar Bawankule On Kirit Somayya :  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पुणे येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आम्ही 2024 साली लोकसभेच्या 45 जागा जिंकू, असा विश्वास व्यक्त केला आहे. बावनकुळे यांना किरीट सोमय्यांविषयी प्रश्न विचारले. भाजप नेते किरीट सोमय्या यांची काही दिवसांपूर्वी कथित व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर आज बावनकुळे यांना सोमय्यांविषयी प्रश्न विचारण्यात आले.

2019 साली लोकसभेच्या निवडणुकीवेळी किरीट सोमय्या यांचे तिकीट कापण्यात आले होते. यानंतर आता 2024 साली किरीट सोमय्यांना लोकसभेचे तिकीट देणार का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बावनकुळेंनी सोमय्यांना तिकटी द्यायचे की नाही हे समन्वय समिती ठरवेल असे म्हटले. तसेच किरिट सोमय्या हे भाजपचे स्टार प्रचारक असतील का असाही प्रश्न त्यांना विचारण्यता आला. यावर स्टार प्रचारकांची यादी केंद्रातून ठरते, असे म्हणत बावनकुळेंनी या प्रश्नाला उत्तर दिले.

कुटुंबासह PM मोदींची भेट म्हणजे CM शिंदेंचा सेंडऑफ; 10 ऑगस्टला राजकीय भूकंप निश्चित!

दरम्यान, सोमय्या यांच्या व्हायरल झालेल्या कथित व्हिडीओ क्लिपमुळे ठाकरे गटाने सोमय्यांची चौकशी करावी, असे म्हटले आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करु, असे आश्वासन दिले. तर किरीट सोमय्या यांनी स्वत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

काँग्रेसमध्येही स्फोट होणार! शिवसेना, राष्ट्रवादीनंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं पुढचं टार्गेट

किरीट सोमय्या हे 2014 ते 2019 या काळात खासदार होते. पण 2019 साली शिवसेनेकडून किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला विरोध असल्याने त्यांना तिकीट नाकरण्यात आले. 2017 साली झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता व्हायरल व्हिडीओ क्लिपमुळे देखील ठाकरे गटाने सोमय्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube